नागपूर : आतापर्यंत ब्युटीपार्लर, स्पा, मसाज पार्लर, पंचकर्म केंद्र आणि सलूनमधेच देहव्यापार होत असल्याचे समोर आले होते. आता पहिल्यांदाच नागपुरात एका बटाटा-कांदा व्यापाऱ्याच्या कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घालून दोन महिलांना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. फुले मार्केटमधील जोशी ट्रेडर्सचा मालक अजय जोशी यालाही अटक करण्यात आली.

जय महादेव जोशी (४२, रा. प्लॉट नं. २१, रामकृष्णनगर, उमरेड रोड, दिघोरी) याचे फुले मार्केटमध्ये जोशी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. जोशी हा कांदे-बटाट्याचा ठोक व्यापारी आहे. मात्र, त्याने कार्यालयातच देहव्यापार सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी जोशीच्या दुकानात छापा घालण्यात आला. तेथे आरोपी दोन महिलांकडून देहव्यापार करवून घेताना आढळला.

Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Regional office of Agriculture and Processed Food Products Export Development Authority APEDA opened in Nagpur Mumbai print news
नागपुरात होणार ‘अपेडा’चे प्रादेशिक कार्यालय; जाणून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पुढाकार घेतला
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
Laurene Powell Jobs in Mahakumbh
Laurene Powell Jobs: स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांना काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग शिवू दिले नाही; कारण काय?

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाने घेतला महिलेचा घास, तेंदूपत्ता गोळा करत असताना…

हेही वाचा – अमरावती : प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या; पत्नीनेच रचला कट

आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल, रोख १५ हजार ५०० रुपये व इतर साहित्य असा एकूण २५ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रमुख कविता इसारकर, हवालदार प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, अश्वीन मांगे, लता गवई आणि शेषराव राऊत यांनी केली.

Story img Loader