नागपूर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा निषेध करणारे भाजपचे कार्यकर्ते होते, मराठा समाज हा जरांगे यांच्या पाठीशी आहे, असे सकल मराठा समाजाचे प्रकाश खंडागळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी नागपुरात जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले होते. याबाबत माहिती देताना खंडागळे म्हणाले , मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे लढा देत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते कटकारस्थान करून त्यांना बदनाम करण्याचा डाव रचत आहे. मात्र सकल मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांच्या लढ्याला नागपूरच्या सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे.

हेही वाचा…अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक विशेष करून स्वतःला मराठा म्हणून म्हणवणारे भाजपचेच कार्यकर्ते आहेत, असाही आरोप खंडागळे यांनी केला. जरांगे यांना कुठलाही धक्का लागला तर त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार व देवेंद्र फडणवीस असेल, असा इशारा त्यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur protest against manoj jarange involvement of bjp karyakartas said sakal maratha samaj s prakash khandagale cwb 76 psg