देशाच्या प्रमुख महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग राज्याची उपराजधानी नागपुरातून जात असल्याने येथील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वेच्या मार्गाच्या तिहेरीकरण, चौपदरीकरणाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आहेत. औद्योगिक विकासपासून कोसोदूर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ाला रेल्वे मार्गाने जोडून तिकडे विकासगंगा नेण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकण्यात आले असले तरी विदर्भातील अनेक रेल्वे प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहेत. गेले कित्येक वर्षांपासून अशीच स्थिती असल्याने विदर्भात रेल्वेचे जाळे मजबूत करून विकास साधण्यासाठी विदर्भात रेल्वेचे स्वतंत्र झोन असावे, अशी भावना निर्माण झाली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in