नागपुरातील पूरबळींची संख्या पाचवर गेली आहे. पुराच्या दिवशी म्हणजे शनिवारी पहाटे सुमारास दोन वेगवेगळ्या घटनेत घरात झोपलेल्या मीरा पिल्ले आणि संध्या ढोरे दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला होता.. तर एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सीताबर्डी परिसरातील नाग नदीच्या प्रवाहात तरंगताना आढळून आला होता.. त्या व्यक्तीची ओळख पटू शकली नव्हती..तर पुरानंतर आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. कृष्णकुमार बरखंडी या बावीस वर्षाच्या तरुणाचा धंतोली परिसरातील एका हॉटेल च्या बेसमेंट मध्ये पाणी भरलेलं असताना इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्याने पाणी बाहेर काढत असताना विजेचा धक्का लागुन मृत्यू झाला.तर ५२ वर्षीय संजय गाडेगावकर यांचा अजनी परिसरातील पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-09-2023 at 22:07 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur rain five flood victims in nagpur cwb 76 zws