नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कन्हानमध्ये प्रचार सभा आहे. मात्र काल रात्री जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सभास्थळी चिखल झाला आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरला आले व रात्रीच सभास्थळ गाठून तेथील पाहणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघातील कन्हान तालुक्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली.
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा येथे पार पडणार आहे. ही प्रचारसभा यशस्वी व्हावी यासाठी केलेल्या तयारीचा तसेच उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः आढावा घेतला.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची ‘उठ-बस’सेना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाठिंब्यासाठी राज यांचे अभिनंदन

विदर्भात मंगळवारी मुसळधार पाऊस पडल्याने सभास्थळाला देखील या पावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे पावसाने कितपत नुकसान झाले आहे आणि त्यात सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कशी यशस्वी करता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभास्थळाची पाहणी केली, झालेल्या तयारीचा आढावा घेतला तसेच सभेचे नियोजन करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader