नागपूर : चोवीस तासाच्या विश्रांतीनंतर नागपूर पुन्हा ओलिचिंब झाले. पावसाने रविवारपासून पुन्हा एकदा जोरात हजेरी लावली आहे. शहरात गेल्या १०-१२ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. शनिवारी त्याने थोडी उसंत घेतली.मात्र, रविवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि काहीसे स्थिरावलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले.रस्त्यावर,खोलगट भागात पाणी साचले.

रात्री रस्त्यांवरील खड्डे दिसून येत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होतं आहे सततच्या पावसाने नागरिकही कंटाळले असून केव्हा हा पाऊस थांबेल याचीच त्यांना प्रतीक्षा आहे.

Story img Loader