नागपूर : पार्टी करून घरी जात असताना मद्यधुंद महिला चालकाने दोन मोपेडस्वार युवकांना कारने चिरडल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली होती. या अपघाताला जबाबदार असलेली ३९ वर्षीय आरोपी महिला रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. तिच्या जामीन अर्जावर आज अवकाशकालीन न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी होईल. मागील शुक्रवारी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. पुण्यातील पोर्शे कार अपघात चर्चेत असतानाच नागपुरातील या हिट अँड रन प्रकरणानेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.

२५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर ही घटना घडली होती. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होती. दरम्यान, तिची कार अनियंत्रित होऊन आधी रामझुल्याच्या कठड्याला धडकली व त्यानंतर कारने मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) हे दोन तरुण मित्र स्वार असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही तरुण दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना जवळच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मोहम्मद हुसैनला तपासून मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

accident on Bandra Worli Bridge
दोन वर्षांपूर्वीचा वांद्रे-वरळी सेतूवरील विचित्र अपघात; मानिसक आजाराने ग्रस्त कार चालकाला उच्च न्यायालयाकडून जामीन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Auto rickshaw driver arrested for raping young woman
मुंबई : तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…”
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
Anjali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania: धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? अंजली दमानियांनी केले नवे आरोप

हेही वाचा : ‘नून सफारी’! ताडोबात वाघापेक्षा महसुलाचीच चिंता अधिक…

दोन्ही तरुण बैंक फायनान्सचे काम करीत होते. त्यांना या क्षेत्रात खूप पुढे जायचे होते. परंतु, रितिकाच्या नशेने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. तहसील पोलिसांनी रितिकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), (निष्काळजीपणाने २७९ वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला.

हेही वाचा : उपराजधानीत कोंडतोय झाडांचा श्वास; शेकडो हात…

रितिकाने सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून अटकपूर्व जामीन मागितला होता. मात्र तो २४ मे रोजी फेटाळण्यात आला. परिणामी, तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील ही घटना देखील पुन्हा चर्चेत आली. यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader