नागपूर : विवाहित असलेल्या प्रेयसीचे दुसऱ्या प्रियकराच्या मित्राशीच सूत जुळले. त्यामुळे तिने पहिल्या प्रियकराशी दुरावा निर्माण केला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीला मारहाण करून मित्रापासून दूर राहण्यास बजावले. मात्र, प्रेयसी आणि दुसऱ्या प्रियकराने कट रचून पहिल्या प्रियकराचा गळा चिरून खून केला. त्याचा मृतदेह जंगलात फेकून पळ काढला. या हत्याकांडात पोलिसांनी प्रेमीयुगुलांचा छडा लावून अटक केली. निलू (झेंडा चौक, तकीया) आणि राहुल रमेश गायकवाड (न्यू गांधी लेआऊट, गोदावरीनगर) अशी अटकेतील प्रेमी युगुलांची नावे आहेत. तर संतोष मनोहर चुन्ने (तकीया, धंतोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चुन्ने हा ई-रिक्षाचालक आहे. त्याच्या पत्नीचे गेल्या तीन वर्षांपूर्वी निधन झाले. एकाकी पडलेल्या संतोषची वस्तीत राहणारी निलूशी ओळख झाली. अनेकदा निलू त्याला जेवायला देत होती. या ओळखीतून दोघांचे सूत जुळले. निलू विवाहित असून तिच्या पतीचे चहाचे दुकान आहे. तो सकाळी सहा वाजता जातो आणि रात्री अकरा वाजता परततो. ही बाब हेरून संतोष निलूच्या घरी जायला लागला.

हेही वाचा – गडचिरोली : कबुतर चोरले? चार चिमुकल्यांना अमानुष मारहाण; व्हायरल व्हिडिओने खळबळ…

एकमेकांच्या संपर्कात राहत असल्यामुळे दोघांचे अनैतिक संबंध जुळले. पती घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघेही घराबाहेर पडत होते. अनेकदा निलू ही संतोषच्या घरी जात होती. दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण तिच्या पतीला लागली. त्यामुळे त्याने निलूला मारहाण केली आणि संतोषपासून दूर राहण्यास बजावले. त्यामुळे चिडलेल्या संतोषने निलूच्या पतीला घरी जाऊन मारहाण केली.

‘यानंतर माझ्या प्रेयसीला मारहाण केल्यास जीवे मारू,’ अशी धमकी दिली.’ तेव्हापासून संतोष आणि निलू उजळ माथ्याने पतीच्या विरोधाला झुगारून अनैतिक संबंध ठेवत होते. यादरम्यान, संतोषचा मित्र राहुल गायकवाड याची नजर निलूवर पडली. मित्राला दगा देऊन त्याने निलूशी मैत्री केली. राहुलने संतोषला माहिती न होऊ देता निलूशी प्रेमसंबंध वाढवले.

निलू ही पती आणि पहिला प्रियकर संतोषच्या चोरून राहुलला भेटायला जात होती. दोघांचेही प्रेमसंबंध वाढले. प्रेयसीचे मित्र राहुलशी सूत जुळल्याची कुणकुण संतोषला लागली. त्याने पाळत ठेवली आणि दोघांनाही नको त्या अवस्थेत पकडले. त्यामुळे त्याने निलू आणि राहुलला मारहाण केली.

संतोषशी दुरावा आणि हत्येचा कट

निलू आणि राहुल यांनी संतोषचा काटा काढण्याचा कट रचला. रविवारी दुपारी निलूने संतोषला जंगलात फिरायला नेण्यास सांगितले. दोघेही ई-रिक्षाने बुटीबोरीजवळील मोहगाव परिसरात गेले. संतोषला निलूने दारु पाजली. त्यानंतर तिने राहुलला फोन करून बोलावून घेतले. दोघांनी मिळून संतोषचा गळा चिरला. त्याचा मृतदेह जंगलात फेकून देऊन दोघेही दुचाकीने नागपुरात परतले.

हेही वाचा – नागपूर : आता मंगळागौरींच्याही स्पर्धा, प्रशिक्षणाचीही सोय, काय आहे हा उपक्रम ?

असा लागला सुगावा

संतोषचा मृतदेह पाण्याने खराब होऊन मृतदेहाची ओळख पटणार नाही, अशा तोऱ्यात निलू आणि राहुल होते. दुसरीकडे ई-रिक्षाच्या क्रमांकावरून संतोषची ओळख पटवून त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्यात शेवटचा फोन निलूला केल्याचा लक्षात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे आणि पथकाने निलूला खाक्या दाखवताच तिने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी निलू आणि प्रियकर राहुल गायकवाडला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur relationship of a married woman with another lover friend person murder adk 83 ssb