नागपूर : कॉंग्रेसच्या दंगाग्रस्त दौरा समितीत अकोला दंगलीतीलआरोपी साजिद पठाण याचा समावेश आहे. यावरून काँग्रेसचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांनी नागपुरात दंगल भडकावली म्हणून समिती स्थापन केली आहे का ?  अशा प्रकारची शंका निर्माण होते. काँग्रेसने वोट बँक करिता हिंदु संघटनांला लक्ष्य करून आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम केले, अशी टीका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

खोपडे यांनी एक निवेदन प्रसिद्धीला दिले. ते म्हणतात, पाच दिवसामध्ये एक ही काँग्रेसचा नेता या दंगाग्रस्त भागात भटकला नाही व देवडिया काँग्रेस भवन सुद्धा त्यांनी बंद ठेवले. त्यातून त्यांचीकाँग्रेसचा हिंदू विरोधी मानसिकता लक्षात येते. भालदारपुरा, हंसापुरी या भागात रस्त्यावर ४०० ते ५०० गाड्या रोज पार्किंग करिता उभ्या राहतात. परंतु दंग्याचा दिवशी समाजाची एकही गाडी या रोडवर नव्हती. सुनियोजितपणे दंगल घडवण्यात आली. एकीकडे हिरवी चादरचा बहाणा करून हिंदू लोकांच्या घराला टार्गेट करून हल्ला करणे, दरवाजे तोडणे,  गाड्यांची तोडफोड करणे यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय होते.

पोलिसांच्या भूमिकेवर शंका

खोपडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली. ज्या दिवशी ही घटना घडली, त्यावेळेस पोलिसांवर हल्ला होत असताना सुद्धा दंगेखोरांवर लाठीहल्ला करण्यात आला नाही , तेथील दुसरीकडे वळवण्याचे आदेश दिले. त्यामुळे हिंसा भडकली, असे खोपडेंचे म्हणणे आहे. याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले.

दंगलखोरांनी अनेक निर्दोष नागरिकांच्या गाड्या जाळल्या, कुणाची क्रेन तर कुणाची कार जाळली. दंगलखोरांना अटक जरी केली असेल पण या निर्दोष नागरिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कशी होणार ? यांचा दोष काय होता ? हा गंभीर प्रश्न असून दंगलखोरांकडून ही नुकसान भरपाई झाली पाहिजे आणि या दंगलखोरांच्या अवैध बांधकाम असेल तर त्यावर बुलडोझर चालवून त्यांचे घर पाडण्याची आवश्यकता असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.