नागपूर : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने सोमवारी दुपारी पोलिसांकडून रितसर परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम महाल-गांधीगेट समोर घेण्यात आला.

त्यानंतर औरंगजेबची प्रतिकात्मक कबरीवर हिरवी चादर टाकून जाळण्यात आली. या घटनेमुळे दंगळ उसळली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. बुधवारी दुपारी चार वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आठ कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांना पोलिसांना आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने राहुल प्रमोद नारनवरे (आयोजक) यांनी महालमधील गांधीगेटसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण केले. या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेने पोलिसांकडून रितसर परवानगी घेतली होती.

मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयतीच्या कार्यक्रमानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यक्रते गोविंद शेंडे, अमोल ठाकरे, डॉ. रामचंद्र दुबे, सुशिल चौरसीया (सेवा प्रमुख), वृषभ अरखेल (सहसंयोजक), शुभम अरखेल (सेवाप्रमुख), मुकेश बारापात्रे (मध्यनागपूर अध्यक्ष) कमल हरियानी (संयोजक), लखन कुरील (विदर्भ सहप्रमुख) यांंनी औरंगजेबचे छायाचित्राला जोडे मारण्याचा आणि जाळण्याचे ठरविले.

त्यानंतर त्यांनी औरंगजेबची प्रतिकात्मक कबर तयार करुन त्यावर मुस्लीम धर्मात पवित्र मानली जाणारी हिरव्या रंगाची चादर टाकून कबर जाळली. हा सर्व प्रकाराचे मोबाईलने व्हिडिओ आणि फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. दुपारी चार वाजताच्या सुमारास मायनॉरिटी डेमोक्रँटीक पक्षाचे शहरअध्यक्ष फहीम खान शमीम खान याने ४० ते ५० युवकांचा जमाव गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेला.

तेथे हिरवी चादर जाळून मुस्लीमांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे गुन्हे दाखल करुन आरोपींना अटक करण्यासाठी तक्रार देण्यात आली. गणेशपेठ पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे युवकांनी संताप व्यक्त करीत पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले. मात्र, त्यांना ताब्यात न घेतल्यामुळे फहीम खान याने नाराजी व्यक्त केली होती.

सायंकाळी अचानक दोन्ही गट आमने सामने आले दगडफेक सुरु झाली. या प्रकरणी पोलिसांनी तीन पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल केले असून १२५० संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी दुपारी विश्व हिंदू परिषदेचे आठ कार्यकर्ते कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन तासांत जामीनावर सुटका केली.

Story img Loader