नागपूर : मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाडच्या पायातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याच्या प्रकरणात संकेतसह गिता शेजवळ आणि इतरांनी चुकीचे जबाब नोंदवल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आता बजाजनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग झाले असून संकेत, गितासह सगळ्यांचे जबाब पुन्हा नोंदवले जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याबाबत शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया म्हणाले, प्रकरणाचे गांभीर्य बघता संकेत गायकवाड, गिता शेजवळसह या प्रकरणाशी संबंधित सगळ्यांचे जबाब नोंदवले जातील. गुन्हे शाखेकडून सोमवारी संकेत, गिता आणि इतरांना जबाब देण्यासाठी बोलावले जाणार आहे.
दरम्यान जखमी गायकवाड यांनी ५ मे २०२२ राजी घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गणवेश घालताना सर्व्हिस रिव्हॉल्वर खाली पडल्याने गोळी सुटली व ती डाव्या पायातून आरपार जाऊन उजव्या पायात फसली. बजाजनगर पोलिसांनी मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ, वीरसेन धावले, कोमल गायकवाड, डॉ. सुधीर देशमुख यांचे म्हणणे नोंदवले. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. चौकशीदरम्यान संकेत आणि इतरांनीही दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे पुढे आले. गोळी सुटली नाही तर झाडली गेली, त्यामुळे त्यांचा खून करण्याचा प्रयत्न होता काय, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
हेही वाचा : “जातनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध”, राहुल गांधी यांची ग्वाही; दिल्लीत ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
दरम्यान, एका महिला अधिकाऱ्याने यापूर्वी आरटीओतील एका मोठ्या अधिकाऱ्याला खोट्या तक्रारीत अडकवण्यासाठी तक्रार दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचे तार त्या घटनेशी जुळल्याचीही चर्चा आरटीओतील अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये आहे. या विषयावर नागपूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून गोळी सुटली नसल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत असल्याचे चौकशीत दिसत असल्याचे मान्य केले. याबाबत बजाज नगर पोलिसांत तक्रारही दिल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, हे प्रकरणही पुन्हा तपासणीसाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केले गेले आहे.
हेही वाचा : “काँग्रेससह विविध पक्षांचे नेते आता महायुतीमध्ये प्रवेश करतील”, चित्रा वाघ असे का म्हणाल्या?
प्रकरण काय?
बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ५ मे २०२२ ला मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली होती. संकेत घरून कर्तव्यावर जाण्यासाठी गणवेश परिधान करतांना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. त्यामुळे त्या गडबडीत रिव्हॉल्वर डाव्या बाजूला खाली पडून त्यातील बुलेट फायर झाली. ही बुलेट त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीमधून आरपार निघून उजव्या पायाच्या पोटरीमध्ये जाऊन फसल्याचा संकेतचा दावा होता.