नागपूर : परिस्थिती अनुकूल असेल, सर्व सुविधा उपलब्ध असेल, प्रशिक्षण देणारे असेल तर स्पर्धेत मिळणारे यश समजण्यासारखे असते. पण परिस्थिती प्रतिकूल असेल, प्रशिक्षण, इतर सुविधा तर सोडाच पण रोज कष्ट करून उदरनिर्वाह करावा लागत असेल तर अशा स्थितीत एका राष्ट्रीय स्पर्धेत एखादी महिला घवघवीत यश संपादित करत असेल तर कौतुकास्पद ठरते. नागपूरमध्ये एका मोलमजुरी करणाऱ्या महिलेने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मिळवलेले यश असेच आहे.
हेही वाचा : शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार, गोंदियात तणाव
६-७ जानेवारी, २०२४ दरम्यान पोरबंदर (गुजरात ) येथे आयोजित अखिल भारतीय सागरी जलतरण स्पर्धेत ३० ते ४५ वयोगटात नागपुरातील ४० वर्षीय ईश्वरी वाटकरने ५ किलोमीटर अंतर २ तास ४२ मिनिटांत पूर्ण करुन दुसरा कमांक पटकाविला. गौरव चिन्ह व रोख बक्षीस देऊन तिला गौरविण्यात आले. या स्पर्धेत देशभरातून विविध गटांत ९५० हून जास्त जलतरणपटू सहभागी झाले होते. ईश्वरी हीने नागपूरच्या लेन्ड्रा पार्कमध्ये मोल मजुरीचे काम करते. दिवसभर मजुरी करुन ती आपला पोहण्याचा छंद जोपासते. यापूर्वीसुध्दा तिने अनेक सागरी लांब पल्याच्या स्पर्धा गाजविल्या आहेत. ती अंबाझरी स्विमिंग क्लबची सदस्य आहे. भोजराज मेश्राम व मनोहर मुळे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.