नागपूर : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) आज ‘जेईई’ मुख्य परीक्षा- २०२२ सत्र एकचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत महाराष्ट्रातून अद्वय क्रिष्णा हा विद्यार्थी पहिला आला आहे. त्याला 99.998449 पर्सेन्टाईल मिळाले आहे.
अद्वयला दहावी परीक्षेत ९६.८ टक्के मिळाले होते. तो जैन इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी असून सीबीएसई बारावीची परीक्षा दिली आहे. मूळचा उत्तर प्रदेश येथील असलेल्या अद्वयचे वडील वेकोलोमध्ये नोकरीला आहेत. अद्वयने दहावीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेतही यश मिळवले होते.
या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के तर एससी, एसटी साठी ६५ टक्के आवश्यक आहेत. या परीक्षेची अंतिम उत्तराची यादी नुकतीच ६ जुलैला प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित टक्के मिळवले आहेत ते पुढील सत्रात म्हणजे दुसऱ्या दोनसाठी पात्र ठरले आहेत. सत्र दोनची परीक्षा झाल्यानंतर ‘एनटीए जेईई ऍडव्हान्स’ परीक्षेसाठीची अंतिम कट ऑफ जाहीर करेल.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
jeemain.nta.nic.in
ntaresults.ac.in
nta.ac.in दरम्यान, ‘एनटीए जेईई’ मुख्य परीक्षा सत्र २ ही परीक्षा २१ ते ३० जुलै या कालावधीत होईल. सत्र २ ची परीक्षा पार झाल्यानंतर ‘कौंसिलिंग’साठी ‘ऑल इंडिया रँक’ आणि ‘कट ऑफ: जाहीर होईल.