नागपूर : जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज बुक ऑफ इंडियात नोंद असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगे हिने आज मतदान केले. यावेळी ती लाल कलरच्या फ्रॉकमध्ये होती आणि शाई लावलेले बोट उंचावून तिने मतदान केल्याचे सांगितले. तिचे कुटुंबीय देखील यावेळी सोबत होते.

ज्योती किसनजी आमगे यांचा जन्म नागपूर येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्या सरासरी उंचीच्या होत्या. त्यानंतर तिला ॲकॉन्ड्रोप्लासिया नावाचा आजार झाला. ज्यामुळे एका विशिष्ट उंचीच्या पुढे तिची उंची वाढली नाही. ज्योती २००९ मध्ये जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आली, जेव्हा ती फ्युजी टिव्हीच्या एक कार्यक्रमात दिसली. त्यानंतर ती त्याच वर्षी मिका सिंगच्या एका गाण्यासाठी व्हिडिओमध्ये दिसली. तिने चॅनलचार डॉक्युमेंट्री बॉडीशॉकमध्ये ती दिसली. या शोमध्ये डॉक्टरांनी तिची उंची मोजली असता, ती फक्त ६१.९५ सेंटीमीटर म्हणजेच सुमारे दोन फूट उंचीची असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिला सर्वात लहान जगातील सर्वात लहान महिला म्हणून मान्यता मिळाली. उल्लेखनीय म्हणजे तिचे वजन फक्त पाच ते साडेपाच किलो होते.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
amar upadhayay mihir virani
पांढऱ्या साड्या नेसून आलेल्या महिलांनी घराबाहेर घातला होता गोंधळ; अभिनेता खुलासा करीत म्हणाला, “माझ्या आईला…”
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Assembly Elections 2024 What is the type of home voting what are its benefits Nagpur news
गृहमतदान काय प्रकार आहे, त्याचे फायदे काय ?
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला

हेही वाचा…नागपूर : ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,’येथे’ मतदानाला एक तास उशिरा सुरुवात

गिनीज बुक मध्ये तशी नोंद आहे. ज्योती यांचे अमेरिकेतील एका युवकासोबत लग्न झाल्याची पोस्ट २०१७ मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे ज्योती यांना दररोज शेकडो फोन येत असत. त्यामुळे प्रत्येकाला ही पोस्ट ‘फेक’ असल्याचे सांगण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. या पोस्टमुळे ज्योती आणि तिच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

हेही वाचा…नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…

ऑगस्ट २०१४ मध्ये “अमेरिकन हॉरर स्टोरी: फ्रीक शो” च्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. २०१८ मध्ये इजिप्तच्या गिझा शहरातील पिरॅमिड्ससमोर,आठ फूट आणि नऊ इंच उंच असलेल्या तुर्कीतील सुलतान कोसेन या जगातील सर्वात उंच पुरुषासोबत उभी दिसली होती. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी इजिप्शियन टुरिझम प्रमोशन बोर्डाने या दोघांना इजिप्तमध्ये आमंत्रित केले होते. तिचा स्वतःचा पुतळा लोणावळा (पुणे) येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये आहे.