वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइतर्फे एकल बालिका शिष्यवृत्ती – २०२३ साठी नोंदणी सुरू झाली आहे. अशा विद्यार्थिनींना १८ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही. मंडळ या शिष्यवृत्तीसाठी कोणताही ऑफलाईन अर्ज तसेच कागदपत्रे स्वीकारणार नाही. मुलींना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज करावा लागेल.
हेही वाचा : काय सांगता? चक्क पावसाळ्यात झाडाला लागले आंबे, तज्ज्ञ म्हणतात…
ज्या मुली अविवाहित एकट्याच आहेत, त्या पात्र ठरतील. मंडळाच्या संलग्न शाळांमध्ये अकरावी किंवा बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी अर्ज करू शकतात. तसेच ज्या विद्यार्थिनींना मंडळाच्या शाळेतून दहाव्या वर्गात पहिल्या पाच विषयांत ६० टक्के गुण मिळाले आहेत, त्याच पात्र ठरणार आहेत. मंडळाच्या वेबसाईटवरील होमपेजवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.