नागपूर : एका स्कूलबस चालकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचा हात कापण्याची धमकी देऊन बलात्कार केला. ही घटना ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत घडली. नितेश राजकुमार गजभिये (२५) रा. हुडकेश्वर असे आरोपीचे नाव आहे. तो खासगी स्कूलबसने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतो. पीडितेची एक मैत्रिणही नितेशच्या स्कूलबसमधून प्रवास करते. त्यामुळे पीडितेशी नितेशची ओळख झाली.
हेही वाचा : आजारी आईचे जेवण, औषधपाणी करायला कंटाळलेल्या मुलाने चाकू आणला अन…
३१ ऑगस्टच्या रात्री आरोपीला पीडिता सायकलवर जाताना दिसली. त्याने तिला थांबवून हात कापण्याची धमकी देत निर्जनस्थळी नेले. येथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो मुलीला सोडून पळून गेला. पीडितेने घरी पोहचून ही माहिती सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.