नागपूर: सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी अपघातग्रस्त बस आणि घटनास्थळाची बुधवारी वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बसचे दोन्ही आपत्कालीन द्वार नादुरुस्त असणे, बस रस्त्यावरून उतरल्यानंतर ब्रेक दाबले गेल्याचे अधिकाऱ्यांच्या प्राथमिक निरीक्षणात पुढे आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, ग्रामीणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सानप, शहरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांच्यासह भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली.

हेही वाचा – मुलीचा अबोला सहन न झाल्याने दिली सहलीला जाण्याची परवानगी

बाहेरून बसच्या वर चढण्यासाठी जिने लावण्यात आल्याने बसचे आपत्कालीन द्वार बंद आढळले. दुसऱ्या आपत्कालीन द्वारावर अतिरिक्त खुर्ची लावल्याने तेही बंद होते. घटनास्थळाची पाहणी केली असता बस रस्त्याखाली उतरल्यावर ब्रेक दाबल्याचे प्राथमिकदृष्ट्या अधिकाऱ्यांना आढळले. त्यामुळे बस चालवताना चालकाचे समोर लक्ष होते का, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे हे धोकादायक वळण असूनही त्याबाबत येथे सूचना नव्हती. या भागातील वळण बघता येथे गतिरोधकाची गरज होती. तेही नसल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले. या अपघातग्रस्त स्थळाजवळ अनेक अपघातानंतर भंगार झालेली वाहनेही आढळली. त्यामुळे येथे नियमित अपघात होत असतानाही त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

अपघातग्रस्त स्थळ हे राज्य महामार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. त्यामुळे निरीक्षणानंतर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी या विभागाला पत्र पाठवत रस्त्याचे डिझाईन चुकीचे असल्याचे कळवले व ठळक अक्षरात अपघातग्रस्त स्थळ लावण्याची विनंती केली.

पीयूसी केंद्राचा शोध घेण्याबाबतही पत्र

अपघातानंतरही पूर्व नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरातील एका केंद्रावरून घेतलेल्या पीयूसी प्रकरणाला नागपूर ग्रामीण आरटीओने गांभीर्याने घेतले आहे. त्यानुसार संबंधित कार्यालयाला पत्र देत तातडीने दोषी केंद्रावर कारवाई करण्याची विनंती केली.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगळ्या पक्षातील नेत्यांच्या मैत्रीचे पर्व

“अपघातग्रस्त स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली. नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल.” – विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण.

अपघातानंतर काढला ट्रॅव्हल्सचा परवाना

अपघातानंतर संबंधित बस मालकाने बसवरील थकीत करापोटीचे १ लाख १ हजार २३६ रुपये तडकाफडकी ऑनलाईन भरले. बसची पीयूसीही नव्हती. पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या पीयूसी केंद्रातून ती वेळेवर काढली गेली. परंतु नागपूर ग्रामीण आरटीओतील अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वाहन उपलब्ध नसतानाही पीयूसी निघाली कशी, हाही प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला.