नागपूर : नागपूरसह देशभरात मध्यंतरी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७५ हजार प्रति दहा ग्रॅमहून अधिकवर गेले होते. परंतु आता हे दर कमी होताना दिसत आहेत. नागपुरातील सराफा बाजारात १० जूनला सोन्याचे दर गेल्या आठवड्याभरातील निच्चांकी पातळीवर नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्यास इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूरसह राज्यातील अनेक भागात आताही विवाह सोहळे सुरू आहेत. या समारंभात वर- वधूला सोन्याचे दागिने घेतले जातात. त्यामुळे हल्ली नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे गर्दी आहे. दरम्यान सोन्याचे दर घसरल्याने या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरातील सराफा बाजारात १० जूनला २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७१ हजार २००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार २००, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ३०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८९ हजार रुपये होता.

हेही वाचा…हिंदू-मुस्‍लीम बंधुभावाचे अनोखे दर्शन, महंमदखान महाराजांच्‍या दिंडीला पंढरपूरची ओढ

नागपुरात २७ मे २०२४ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७२ हजार ४००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ३००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार १०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९० हजार १०० रुपये होता. हे दर २० मे २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार २००, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९१ हजार ७०० रुपये होता.

सोने- चांदीच्या दरात बदल

नागपूरसह देशात करोनानंतर सातत्याने सोने- चांदीच्या दरात बदल होतांना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये सोन्याचे दर जास्तच वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा लाभ झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांतील सोन्याच्या दरातील वाढ बघता सराफा व्यवसायिकांकडून या धातूमध्ये गुंतवणूक फायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा…बुलढाणा : एकाच जिल्ह्यातील दोन खासदार मंत्री, नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा उंचावल्या

सोने खरेदीची चांगली संधी

नागपुरातील सराफा व्यावसायिकांच्या माहितीनुसार, सध्या सोन्याचे दर कमी झाली असले तरी आंतराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघता दर लवकरच पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या खरेदीची चांगली संधी आहे. खरेदीला विलंब केल्यास दास्त दराने ते खरेदी करावे लागण्याची शक्यता आहे.