फेसबुकवरून मैत्री करून तरूणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रियकर तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हेमंत मनोहर मेश्राम (२८, शुभम कॉलनी, यवतमाळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २८ वर्षीय तरूणी मूळची भद्रावती शहरातील असून ती नागपुरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. तसेच ती स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करते. आरोपी हेमंत मेश्राम हा देखील नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. फेसबुकवरून त्याने रियाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघांची चँटिंग सुरू झाली. महिन्याभरात त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेत व्हॉट्सअँपवरुन संपर्क वाढवला. नागपुरात दोघांच्या भेटी झाल्या. यादरम्यान दोघांचे सूत जुळले.

नागपुरातील धक्कादायक घटना; १२ वर्षाच्या मुलीवर नऊ जणांकडून सामूहिक बलात्कार

२१ एप्रिलला हेमंत तरूणीच्या महाविद्यालयात गेला. त्याने महत्वाचे बोलायचे असल्याचे सांगून तिला दुचाकीने गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या मित्राच्या खोलीवर नेले. तेथे त्याने तिच्याशी बळजबरी केली. त्यातून ती गर्भवती झाली. यानंतर पीडित तरूणीने ही बाब हेमंतला सांगितली व लग्नाचा आग्रह धरला. मात्र, हेमंतने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. तू अन्य युवकांकडून गर्भवती झाली असल्याचे सांगून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरूणीने थेट पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur sexual abuse of young woman by facebook friend crime of rape on lover msr