नागपूर : साप आणि मुंगूस यांचे वैर जन्मोजन्मीचे. ते किती टोकाचे असेल हे देखील सर्वांनी ऐकले असेल. एकमेकांचे कट्टर शत्रु असणारे हे दोघेही जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा कुणा एकाचा तरी जीव जाईपर्यंत ते एकमेकांना सोडत नाही. पेंच व्याघ्रप्रकल्पालगत राष्ट्रीय महामार्गावर खवासाजवळ मुंगूस आणि कोब्रा समोरासमोर आले. त्यांच्यात सुरुवातीला ‘कोल्डवॉर’ रंगले आणि नंतर दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र त्यांनी आपआपली वाट पकडली. त्यांच्यातला हा गूढ क्षण ‘डेक्कन ड्रीफ्ट’चे पीयूष आकरे यांनी कॅमेऱ्यात टिपला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विधानसभा निवडणूक : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजेवर गंडांतर; अपरिहार्य कारणाशिवाय रजा घेतली तर…

मुंगूस हा भयंकर मोठा शिकारी आहे. तो सहसा विनाकारण शिकार करत नाही, पण सापाला ते मारतात कारण साप हे मुंगूसच्या आहारातील मुख्य अन्न आहे. साप मनुष्यासहित अनेक प्राण्यांना पाणी पाजतो, तोच साप मुंगुसासमोर नांगी टाकतो. या व्हिडिओत एक मोठा कोब्रा आहे. रस्त्यावरील या कोब्रासमोर अचानक एक मुंगूस येते. सापाला बघताच मुंगुसाला बळ येते आणि तो कोब्रावर जोरदार हल्ला करतो. अचानक झालेल्या या हल्ल्याने कोब्रा दचकतो. तेवढ्याच वेळात मुंगूस परत महामार्गालगतच्या झुडूपांमध्ये जातो. पुन्हा लगेच तो परत येतो आणि कोब्रावर हल्ला करतो, पण यावेळी सावध असलेला आणि मुंगुसाच्या हल्ल्यामुळे चवताळलेला कोब्रा देखील त्याला डिवचतो. त्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहात आपआपल्या वाटेने परत जातात. साप आणि मुगुसाची लढाई अनेकदा होत असली तरी सहसा ती बघायला मिळत नाही.

मुंगूस हा विषारी साप, विशेषत: कोब्रा यांच्याशी लढण्याच्या आणि मारण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. एकमेकांचे कट्टर वैरी असणारे मुंगूस आणि साप सहसा जीव जाईपर्यंत एकमेकांना सोडत नाही. साप दिसताच मुंगूस त्याच्यावर हल्ला करण्याची संधी सोडत नाही. भारतीय राखाडी मुंगूस हा सर्वात सुप्रसिद्ध सापांच्या शिकाऱ्यांपैकी एक आहे, जो जगातील सर्वात प्राणघातक सापांपैकी एक असलेल्या किंग कोब्राला मारण्यासाठी ओळखला जातो. हे मुंगूस या सापांची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात शिकार करतात आणि त्यांना मारतात, विषाच्या पिशव्या खातात. मुंगूस विविध प्रकारचे साप मारतात, परंतु कोब्रा या यादीत खूप वरचे आहेत. मुंगूस मोठ्या प्रमाणात विषारी सापांच्या विषापासून रोगप्रतिकारक असतात. माणसांमध्ये शत्रुत्त्व असणे सामान्य आहे, जे त्यांच्या वागण्याबोलण्यामुळे होते. मात्र, काही प्राण्यांमध्येही भयंकर वैर असते आणि ते निसर्गानेच निर्माण केले असते. साप आणि मुंगूस यांच्यातील वैर हे असेच आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur snake vs mongoose fight video outside the pench tiger reserve rgc 76 css