नागपूर : राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राची निर्मिती झाल्यापासून देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून विजयी होत आहे. उपमुख्यमंत्री यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील हालचालींकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यंदा दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीसाठी ४० अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी निवडणूक आयोगाने १९ अर्ज स्वीकारले तर १८ अर्ज बाद केले. उर्वरित तीन अर्जांवर अद्याप निर्णय झालेला नाही. बुधवारी सायंकाळपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघापैंकी सर्वाधिक अर्ज दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातच बाद झालेले आहेत.

यांचे अर्ज मंजूर

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपच्यावतीने स्वत: देवेंद्र फडणवीस मैदानात आहेत तर त्यांचे मुख्य प्रतिद्वंदी म्हणून कॉँग्रेसने प्रफुल गुडधे पाटील यांना निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे. दोन्ही प्रमुख उमेदवाराचे अर्ज निवडणूक आयोगाने मंजूर केले आहेत. याशिवाय भीमसनेचे पंकज शंभरकर, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे मारोती वानखेडे, बहुजन समाज पक्षाचे सुरेंद्र डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे ओपुल तामगाडगे, अखिल भारतीय परिवार पक्षाच्या उषा ढोक, विकास इंडिया पक्षाचे विनायक अवचट यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. अपक्ष उमेदवारांमध्ये नितीन गायकवाड, सचिन वाघाडे, महमूद खान, विनोद मेश्राम यांचा समावेश आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात काही उमेदवारांनी एकपेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. यात कॉंग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांनी सर्वाधिक चार तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी दोन अर्ज दाखल होते. दोघांचेही सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. ४ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीपर्यंत इतर अर्ज मागे घेतले जातील.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Opposition from the State Public Works Department Contractors Association to the Governor Chief Minister Deputy Chief Ministers regarding the payment of arrears Nagpur news
मुख्यमंत्री, उपमख्यमंत्र्यांना काळी पणती, काळे आकाश कंदील पाठवणार
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा >>>ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…

बाद झालेले उमेदवार

दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकूण ४० अर्जांपैकी १८ अर्ज बाद झाले. यात देश जनहित पक्षाचे घनश्याम पुरोहित, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे ॲड.संतोष लांजेवार, लोक स्वराज्य पक्षाचे अमोल हाडके, रिपब्लिकन पक्षाचे रामचंद्र वानखेडे, बळीराजा पक्षाचे दत्तु मोहिते, राष्ट्रीय गोंडवाना पक्षाच्या संस्कृती पेंडोर, रिपब्लिकन सेनेचे राजेंद्र मेश्राम यांचे अर्ज बाद करण्यात आले. याशिवाय अपक्ष उमेदवार जॉनी रायबोर्डी, सुरेश घाटे, वर्षा नांदगावे, चक्रधर जांभुळे, अजय डांगे, यशवंत कावरे, पंकज काळबांडे, उषा चौधरी यांचे अर्ज बाद झाले.

Story img Loader