नागपूर : उपराजधानीतील नागरिकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती वाढत आहे. मागील तीन वर्षांचा विचार केल्यास इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तिप्पट झाल्याचे माहितीच्या अधिकारातून अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक वाहन निर्मात्या कंपन्या विविध कार्स बाजारात आणत आहेत. या कार्सना भारतीय ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. अनेक कार कंपन्या सध्या इलेक्ट्रिक कार्स बनवण्याकडेसुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. नावाजलेल्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीच्याही जाहिराती होऊ लागल्या आहेत. एकीकडे नवनवीन वाहने मार्केटमध्ये येत असतानाच दुसरीकडे मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीमध्ये ११ टक्क्याने घट झाल्याचे पुढे आले आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?

हेही वाचा…कन्हैयाकुमारकडून कारवाईचा बडगा, काँग्रेसच्या ‘या’ विभागाच्या सर्व शाखा बरखास्त

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरकडून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये विक्री झालेल्या २५ हजार ३५७ वाहनांची नोंद नागपूर शहर आरटीओमध्ये झाली. त्यानंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा महामारीमुळे वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाला. २०२० मध्ये १६ हजार ८०४ तर २०२१ मध्ये १९ हजार ३०२ वाहनांची नोंदणी झाली. २०२२ पासून परिस्थिती बदलू लागली.

२०२२ या वर्षात २४ हजार ३६७ वाहनांची नोंदणी झाली तर २०२३ मध्ये मागील पाच वर्षांतील सर्वाधिक, २६ हजार ७३१ वाहनांची नोंदणी झाली. २०२४ मध्येही वाहनांची विक्री वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र जानेवार ते नोव्हेंबरपर्यंत २३ हजार ६२० वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत कमी वाहनांची विक्री झाल्याचे दिसून येते. नागपुरात २०२१- २२ मध्ये १ हजार ९७२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. ही संख्या २०२२- २३ मध्ये ३ हजार ७५६ आणि २०२३- ऑक्टोंबर २०२४ पर्यंत ३ हजार ७०७ इतकी नोंदवली गेली. त्यामुळे २०२१- २२ च्या तुलनेत २०२३- २४ मध्ये तिप्पट इलेक्ट्रिक वाहनाची विक्री नोंदवली गेली.

हेही वाचा…‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले

५० हजारांवर दुचाकी व २२ हजार कारची नोंदणी

२०२२ ते २०२४ या वर्षांत शहर आरटीओ कार्यालयात ५० हजार २७३ तर २२ हजार ७२६ कार्सची नोंदणी झाली. या शिवाय १६५ बस, ५९५ ई-रिक्षा, १,६४६ गूड कॅरिअर, ८८० मोटार कॅब, ६४३ ऑटोरिक्षा यासह इतरही वाहने मिळून ७८ हजार २६३ वाहनांची नोंद झाली आहे.

Story img Loader