नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वर्गमैत्रिणीसह प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियकराने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पीयूषा वेळकर (२६, नवीन कामठी) असे मृत युवतीचे नाव आहे. तर सागर राजू करडे (३०, कन्हान) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूषा ही नवीन कामठीत आईवडील आणि भावासह राहते. तिचे वडील व्यवसाय करतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख वर्गमित्र सागर करडे याच्याशी झाली. दोघांची मैत्री झाली. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असताना सागरने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही होकर दिला. दोघांनीही कुटुंबियांची परवानगी घेऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही कुटुंबियांशी प्रेमविवाहाबाबत विचारणा करण्याचे ठरविले. दोघांचेही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्न केल्यानंतर जगायचे कसे? असा प्रश्न करीत नोकरी लागल्यावर कुटुंबियांशी चर्चा करुन लग्न ठरवू, असे सांगून पीयूषाची समजूत घातली. पीयूषा एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली तर सागर मुंबईला एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला लागला.

Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Live-In Registration Mandatory UCC Rules in Marathi
Live-In Registration Mandatory : लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीपासून UCC चे नवे नियम लागू होण्याची शक्यता
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा – चंद्रपूर : नायलॉन मांजा विक्री करणारे हद्दपार, राज्यातील पहिलीच कारवाई

लग्नाचा तगादा आणि प्रियकराची टाळाटाळ

पीयूषा आणि सागर दोघेही नोकरी करीत असल्यामुळे आता लग्नाला कुणी विरोध करणार नाही, अशी धारणा ठेवून सागरकडे लग्नाचा तगदा लावत होती. मात्र, सागर वेगवेगळी कारणे देऊन लग्नास टाळाटाळ करीत होता. प्रियकराची लग्नास टाळाटाळ बघता पीयूषा नैराश्यात गेली. तिने नोकरी सोडून दिली आणि घरी राहायला लागली. यादरम्यान, तिला अनेकदा चांगली स्थळे आली. परंतु, तिने नकार देऊन सागरची वाट बघण्याचे ठरविले.

हेही वाचा – अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

प्रियकराचा नकार अन् प्रेयसीची आत्महत्या

१० डिसेंबरला पीयूषाने सागरला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी सागरने तिला थेट लग्न करण्यास नकार देऊन चांगला मुलगा बघून लग्न करण्याचा सल्ला दिला. कुटुंबियांनी लग्न करण्यास नकार दिल्याचा बहाणा सागरने करीत पुन्हा लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीयूषा आणखी नैराश्यात गेली. ती अबोल झाली. तिने ‌वडिलांकडे सागरबाबत सांगून त्याच्या आईवडिलांना लग्नाबाबत विनंती करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, सागरने लग्न करण्यास नकार देऊन संबंध संपल्याचे सांगितले. त्यामुळे पीयूषाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. सागरने प्रेमात दगा दिल्यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे तिने आईकडे बोलून दाखवले होते. आईने तिला धीर देऊन सांत्वन केले होते. मात्र, पीयूषाने २९ डिसेंबरला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी सागरवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

Story img Loader