नागपूर : शहरातील नागनदीच्या विकासासोबत आता शहरातील प्रमुख नदी असलेल्या उत्तर पोरा नदीचा चेहरा-मोहरा पुढील दोन वर्षात बदलणार आहे, यासाठी महापालिकेने पोरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने ८१० कोटीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.येत्या २ वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा व पोरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी शहरातील नदी स्वच्छता अभियान राबवले जाते. त्यात केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२.० योजनेअंतर्गत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील साऊथ सिवरेज झोन व हुडकेश्वर आणि नरसाळासाठी सांडपाणी संकलन प्रणालीचा विकास व प्रक्रियाबाबतचा पोरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबवण्यात येत आहे.

हेही वाचा…गडकरी सकाळी नागपुरात, दुपारी पुण्यात, सायंकाळी पुन्हा नागपुरात

या प्रकल्पासाठी ५ पॅकेजमध्ये विभागणी करून एकूण ८१०.२८ कोटींच्या निविदा तयार करण्यात आलेल्या आहेत.यात पॅकेज एक मध्ये ४५ द.ल.लि. सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन, वेट वेल, पंपिंग मेनसाठी राशी १०९.२९ कोटी, पॅकेज दोनमध्ये सिवरेज सबझोन एकसाठी १७५.४० कोटी, तिसऱ्या पॅकेजमध्ये सिवरेज सबझोन-२ व ३ साठी २५४.६३ कोटी, पॅकेज ४ मध्ये सिवरेज सबझोन ४ साठी ११५.५० कोटी, पॅकेज ५, हुडकेश्वर व नरसाळासाठी १५५.४६ कोटी असा खर्च अपेक्षित आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२.० अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान २५ टक्के, राज्यशासन अनुज्ञेय अनुदान २५ टक्के महापालिकेला प्राप्त होणार आहे, यात नागपूर महापालिकेचा ५० टक्के हिस्सा राहणार आहे. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल ९५७.०१ कोटी आहे. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग यांनी दिलेल्या तांत्रिक मान्यतेनुसार यास राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

हेही वाचा…न्यायालयातील ‘ई-फायलिंग’ला वकिलांचाच विरोध, ही आहेत कारणे

पोरा नदी ही नाग नदीची उजव्या किनाऱ्यावरील एक उपनदी आहे. १२ किमी असलेल्या या नदीचे उगम स्थळ अप्रगम्य आहे, परंतु असे मानले जाते की ही नदी सोनेगाव तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेतरी उद्भवली आहे. काही स्रोत दक्षिण पश्चिम नागपुरातील यशोदा नगर भागात या नदीच्या उत्पत्तीचा दावा करतात. तितूरजवळ नाग आणि पोरा नद्यांचे संगम स्थळ आहे. पोरा नदी ही महाराष्ट्रातील, नागपूर शहराच्या दक्षिणेकडील भागात वाहणारी नदी आहे.

महापालिकेने ब्रिटिश काळात तयार केलेल्या शहराच्या टोपोग्राफी पत्रिकांवर त्याचे अस्तित्व आढळल्यानंतर नदी ठिकाणी विक्रम नोंदवला गेला आहे. या पोरा नदीला लागून सहकारनगर येथे सोनेगाव रोड पुलाजवळ एक प्राचीन नाग मंदिर आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur the pora river will be pollution free in 2 years tender process initiated for river pollution abatement project vmb 67 psg