नागपुरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम उघडून चोराने ५ लाख ८२ हजार रुपये चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. शनिवारच्या पहाटे एक ते दोन वाजेदरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस गस्त किती गांभीर्याने करतात, हे लक्षात येत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चोरट्याने पासवर्डच्या मदतीने एटीएम मशीनचे दार उघडले –

पंचशील चौकात स्टेट बँकेचे कार्यालय आणि एटीएम आहे. एटीएम मशीनमध्ये पैसे ठेवण्यासाठी व्हॉल्व ट्रे असतात. या ट्रे मध्ये पैसे भरण्यासाठी एक चावी असते आणि त्या चावीचा पासवर्ड असतो. एटीएमध्ये पैसे भरणाऱ्यांशिवाय हा पासवर्ड कुणालाच माहित नसतो. घटनेच्या वेळी एक चोरटा पायीच एटीएममध्ये आला. चोरट्याने स्कार्फने आपले तोंड झाकले होते. त्याचप्रमाणे हातात ग्लोव्ज होते. चोरट्याने पासवर्डच्या मदतीने एटीएम मशीनचे दार उघडले. मशीनमध्ये दोन ट्रेमध्ये पाचशेच्या नोटा, तिसऱ्या ट्रे मध्ये दोनशेच्या आणि चौथ्या ट्रेमध्ये शंभराच्या नोटा होत्या. चोरट्याने शंभर आणि दोनशेच्या नोटांना हात न लावता केवळ पाचशेच्या नोटा काढून घेतल्या आणि बँकेतून पळ काढला. चोरट्याने ५ लाख ८२ हजार रुपये चोरून नेल्याची माहिती आहे.

शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास साफसफाई करण्यासाठी एक महिला असता तिला एटीएमचे दार उघडे दिसले. त्या महिलेने ही माहिती बँकेचे व्यवस्थापक बलवंत कुमार यांना दिली. मुख्य शाखेतून वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास सीताबर्डी पोलिसांना ही माहिती देण्यात आली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी –

सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनिस, निरीक्षक अमोल काचोरे हे घटनास्थळी आले. त्याचप्रमाणे ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता चोरटा एकच असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे तो पायी गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी व्यवस्थापक बलवंत कुमार यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोरट्याचे बँक कनेक्शन? –

एटीएमबाबत बँक कर्मचारी आणि एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या यंत्रणे शिवाय कुणालाही तांत्रिक ज्ञान नसते. चोरट्याने मशीनची तोडफोड न करता अलगदपणे ५ लाख ८२ हजार रुपये चोरून नेले. त्यावरून चोरट्याचे संबंध बँक कर्मचारी किंवा पैसे भरणाऱ्या पथकाशी जुळले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यावरून सीताबर्डी पोलीस पुढील तपास करीत आहेत.