दुर्ग-इतवारी दरम्यान रेल्वेचा तिसरा मार्ग तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या ५८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, रेल्वे प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारित दुर्ग-गोंदिया-नागपूर दरम्यान रेल्वे रुळ टाकले जात आहे. त्यामुळे रेल्वे विभागाकडून या ५८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुर्ग-इतवारी दरम्यान रेल्वेचा तिसरा मार्ग तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या एकूण १२९ मेल-एक्सप्रेस-पॅसेंजर रेल्वेगाड्यांपैकी २२ दैनिक रेल्वेगाड्या, ३६ साप्ताहिक रेल्वेगाड्या रेल्वे प्रशासनाने ३० आणि ३१ ऑगस्ट दरम्यान रद्द केल्या आहेत.

Story img Loader