नागपूर : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धुम आहे. मंडप सजले, देखावे लागलेले आहेत, डोळ्यांचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक मंडळांनी आकर्षक अशा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीला ’विघ्नहर्ता’म्हणून पुजले जाते. अनेक जण त्यांच्यावरील संकट दूर व्हावे म्हणून श्रीगणेशाला साकडेही घालतात. श्रद्धेपोटी काही दानही करतात. त्यासाठी मंडपात दान पेट्या ठेवलेल्या आहेत. अशीच एक दानपेटी महाल भागातील एका गणेश मंडळाच्या मंडपात ठेवण्यात आली होती, तेथे चोरट्यांनी डाव साधला.

महाल परिसरातील एका गणेश मंडळाची दानपेटी चोरट्यांनी पळवल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. सकाळी आरतीच्या वेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली. प्राप्त माहितीनुसार बुधवारी पहाटेच्या वेळी मंडपाजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीच्या वाहनाने मंडळाच्या सचिवाच्या दुचाकीला धडक दिली. त्याचा आवाज ऐकल्यावर परिसरातील नागरिक उठले. मंडपात झोपणाऱ्यांनाही जाग आली. या गोंधळातच अज्ञात व्यक्तींनी मंडपातील दानपेटी पळवली. चोरट्यांनी त्यातील ५०० व १०० च्या नोटा घेतल्या, मात्र दहा आणि वीस रुपयांच्या नोटा पेटीतच ठेवल्या. कार्यकर्ते सकाळी आरतीसाठी आले असता त्यांना दानपेटी मंडपात दिसली नाही. त्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले असता मंडपाच्या मागच्या बाजूला दानपेटी सापडली. चोरट्यांनी त्यातून सात ते आठ हजार रुपये पळवल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.

Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
CPI(M) General Secretary Sitaram Yechury died at 72 in delhi marathi news
Sitaram Yechury Passed Away: माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
ED seized assets worth Rs 43 crore 52 lakh in case of defrauding bank group
बापरे, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावानेही फसवणूक
Sitaram Yechury, Nagpur University,
नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी रद्द केले होते सीताराम येच्युरी यांचे व्याख्यान
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाने ऐनवेळी रद्द केले होते सीताराम येच्युरी यांचे व्याख्यान

महाल भागात राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने परिसरात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असते. त्याच परिसरात ही घटना घडली. चोरट्यांनी विघ्नहर्त्यालाही सोडले नाही. दरम्यान सार्वजनिक गणेश मंडळाना परवानगी देताना महापालिकेने सुरक्षेची जबाबदारी मंडळावर टाकली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रात्रीच्या वेळी मंडळाचे कार्यकर्ते मंडपात गस्त घालतात. उशिरा रात्रीपर्यंत तेथे कार्यकर्त्यांची ये-जा सुरू असते. महाल हा नागपूरचा जुना भाग आहे. तेथे दाटीवाटीची लोक वस्ती आहे. अशा स्थितीत मंडपातून दानपेटी चोरीला जाणे व ते कोणालाही न कळणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा – बापरे, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावानेही फसवणूक

नागपूरमध्ये अनेक मोठी गणेश मंडळ असून दरवर्षी ते मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. अनेक भाविक गणेशाच्या दर्शनाच्या वेळी कमी-अधिक प्रमाणात दान करीत असतात. दानपेटी चोरीच्या घटनेमुळे आता मंडळाच्या व दानपेटीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांकडून गृहरक्षक दलाचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे.