नागपूर : पूर्व नागपुरातील कळमना ते पारडी दरम्यानचा निर्माणाधीन उड्डाण पूल कोळसण्याची कारणे शोधण्यात दोन तज्ज्ञ समित्यांना अपयश आले असून पूल नेमका का कोसळला? याचे गुढ कायम आहे.

हेही वाचा >>> सैन्यदलात अग्नीवीरांच्या भरतीचा कंत्राटदार कोण? जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारला बोचरा सवाल

Highway between Navi Mumbai and Bangalore with airport landing facility
नवी मुंबई ते बंगळूरू दरम्यान विमान उतरण्याची सुविधा असलेला महामार्ग; नितीन गडकरी यांची घोषणा
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Protest of students, traffic jam, chinchoti road,
वसई : वाहतूक कोंडीपासून त्रस्त विद्यार्थी व भूमिपुत्रांचे आंदोलन, महामार्ग व चिंचोटी रस्त्याच्या समस्येबाबत संताप
congress mp praniti shinde alleged plastic mixed rice distributed to ration card holders
प्लास्टिक तांदूळ खाण्यास मारक की पोषक? खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाने वाद; प्रशासनाचा अनुकूल दावा
PM Modi inaugurates Rs 11200 crore projects in Maharashtra
आचारसंहितेपूर्वी उद्घाटनांचा धडाका;‘डबल इंजिन’मुळे राज्याच्या विकासाला गती- मोदी
Wardha, P M Vishwakarma Yojana, artisans,
देशी कारागिरांना भरभरून प्रतिसाद, तब्बल दहा लाखाची विक्री
Vande Bharat Express Success or Failure Why are some Vande Bharat lying in the dust
विश्लेषण : वंदे भारत एक्सप्रेस यशस्वी की अयशस्वी? काही वंदे भारत धूळखात का पडून आहेत?
village extension officer arrested by acb while accepting bribe
नाशिक : जळगावमध्ये लाच स्वीकारताना ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या उड्डाण पुलाचे बांधकाम करीत आहे. हा निर्माणधीन पूल १९ ऑक्टोबर २०२१ कोसळला होता. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही, परंतु बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही बाब एनएचआयने गंभीर्याने घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर आयआयटी मुंबईच्या तीन तज्ज्ञांच्या समितीकडून पूल कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती नेमली होती. समितीने केलेल्या चौकशीत बांधकामाची गुणवत्ता योग्य असल्याचे आढळून आले.

हेही वाचा >>> ‘उद्धव ठाकरे’ नावाची किंमत ते विधानपरिषद निवडणुकीची चिंता… शिवसेना वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांची चौफेर टोलेबाजी! 

त्यानंतर एनएचएआयने आणखी एक समिती स्थापन केली. या समितीमध्येदेखील तीन तज्ज्ञ होते. या समितीला देखील पूल कोसळण्याची कारणे शोधता आले नाहीत, असे एनएचएआयचे विभागीय अधिकारी व मुख्य महाव्यवस्थापक राजीव अग्रवाल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ मध्ये या पुलाचे भूमिपूजन झाले होते. तीन वर्षात पूल पूर्ण होणे अपेक्षित होते. विलंबामुळे या प्रकल्पाची किंमत वाढली. शिवाय आणखी सहा महिने पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास लागणार आहे.

हेही वाचा >>> “मी जर चिंता करत बसलो तर…”, उद्धव ठाकरेंचा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना संदेश!

दरम्यान, पुलाच्या बांधकामावर ४४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु आता ४८ कोटी रुपये अतिरिक्त खर्च होतील. या पुलाचे काम २०२२ च्या अखेर पूर्ण होईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.