नागपूर : देशांतर्गंत विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा लाभ घेत इंडिगो वेगवेगळ्या शहारादरम्यान विमानसेवा सुरू करीत आहे. आता ही कंपनी नागपूर-जयपूर विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन करीत आहे. त्यांची ही सेवा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या नागपूरहून थेट जयपूरसाठी विमान नाही. नागपूरहून जयपूरला जाण्यासाठी प्रवाशांना दिल्ली, मुंबई, इंदूरमार्गे जावे लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयपूरला थेट विमानसेवा असल्यास सव्वा ते दीड तासात पोहचणे शक्य आहे. परंतु दिल्ली किंवा इतर मार्गाने गेल्यास जयपूरला पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. अनेक दिवसांपासून थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी  केली जात होती. आता इंडिगोने नागपूरहून जयपूरला थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईन्स ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विमान सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur to jaipur by air plane by indigo flight in august rbt 74 ysh