नागपूर : नागपूरहून कोलकाताच्या दिशेने झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन विमानतळ अधिकाऱ्यांना आल्याने तातडीने विमान रायपूरला उतरवण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याचे समजाच प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. विमानात १५० प्रवाशी प्रवासी होते. अलिकडे देशात विमानात बॉम्ब ठेवल्याचे ई-मेल आणि फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षा यंत्रणावर दडपण वाढले आहे. इंडिगो कंपनीच्या एका विमानामध्ये अशाच प्रकारे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नागपूरवरून कोलकाताला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली.

बॉम्बने विमान उडवण्याची धमकी मिळताच एकाच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वैमानिकाला याबाबत कळवण्यात आले. त्याने विमान रायपूरकडे वळते केले. येथे विमान उतरताच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. विमानांची तपासणी केली गेली. तसेच ही धमकी कुठून आली याबाबत चौकशी देखील केली जात आहे. सीआयएसएफ आणि रायपूर पोलिसांच्या पथकाने तपासणी सुरु केली आहे. देशातील विविध विमानतळ आणि विमानात बॉम्ब असल्याचे धमकी ऑक्टोबर महिन्यापासून येत आहे. गेल्या दोन महिन्यात सुमारे ९० विमानांध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या गेल्या दोन महिन्यात मिळाल्या आहेत. या सर्व धमक्या खोट्या निघाल्या आहेत. परंतु, यामुळे २०० कोटींचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of passengers
Mumbai-Prayagraj Flight Fare : महाकुंभमुळे विमान प्रवास १६२ टक्क्यांनी महागला, जाणून घ्या मुंबई-प्रयागराज विमानाचे तिकीट दर
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Ban, laser light beam, Shirdi airport area,
शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी
thrat note found bomb in plane from Goa to Mumbai alerting authorities mumbai print news sud 02
विमानांमध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी, गुन्हा दाखल
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद

हेही वाचा : “‘शेटजी-भटजी’च्या पक्षाला ओबीसी नेत्यांनी मोठे केले”, पटोले म्हणतात, “बावनकुळेंनी अपमान सहन करण्यापेक्षा…”

जगदीश उईके या नावाच्या व्यक्तीस काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर देशभरातील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याच आरोप आहे. त्याची चौकशी करण्यात आली. तो दिशाभूल करत असणारी माहिती दिल्याचे नागपूर पोलिसांचे म्हणणे आहे. एनआयए, आयबी, एटीएसकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या अकासा एअरच्या फ्लाइटला आणि मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. या काळात तीन दिवसांत इंडियन एअरलाइन्सच्या एकूण १२ विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. याशिवाय २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाला धमकावून विमान टेक ऑफ केल्यास एकाही प्रवाशाला जिवंत सोडणार नाही, असे सांगितले होते.

हेही वाचा : “अमित शाह यांनी महाराष्ट्र अदानीला विकला”, कन्हैया कुमार गरजले, “कमळाचे फूल उगवले अन् दहशत, गुंडागर्दीचे पीक…”

त्यानंतर तपास केला असता तो तरुण खोटे बोलत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विमानाचे उड्डाण करण्यास विलंब झाला. १४ ऑक्टोबरपासून देशभरातील विविध विमानतळांवर शेकडो बॉम्बच्या धमक्या आल्या आहे. या धोक्यांमुळे विमानतळ आणि विमान कंपन्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

Story img Loader