नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपालांनी नुकतेच निलंबित केले. त्यांच्यावर अनेक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्यानंतर आता विद्यापीठातील काही कर्मचारी पैसे भरण्याच्या खिडकीवर पैशांची अफरातफर करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यात आतापर्यंत ८० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही आहे. याबाबत वित्त विभागाकडून दोन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, याबाबत माहिती देण्याबाबत अधिकाऱ्यांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे.

विद्यापीठामध्ये दररोज विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी विद्यार्थी येतात. विद्यापीठाच्या शुल्क भरण्याच्या खिडकीवर ते शुल्क भरून पावती घेऊन जातात. शुल्क भरल्यावर रोख रकमेसह त्याची पावती विभागात जमा करावी लागते. शुल्कासाठी कॅश काउंटरवरून पावती मिळते. त्यातून नेमकी किती शुल्क भरण्यात आले आहे याची माहिती मिळते. मात्र, विद्यार्थ्यांकडून आलेल्या शुल्काची पावती आणि शुल्क न भरता ही पावती रद्द करून दुसरी पावती तयार करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून असा प्रकार सुरू असल्याची कुणकूण अधिकाऱ्यांना लागली. शिवाय हिशेबात दिसणारी तफावत यामुळे वित्त अधिकाऱ्यांकडून या प्रकाराची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये दोन कर्मचाऱ्यांकडून अशाप्रकारे बऱ्याच मोठ्या रकमेच्या पावत्या रद्द करीत नव्या पावत्या तयार करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – अकोल्यात भाजपच्या उमेदवारीत धक्कातंत्र ?

हेही वाचा – प्रा. साईबाबा यांच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली असून त्यातून जवळपास ८० लाख रुपयांचा अपहार झाला असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या वित्त विभागामध्ये टी. एम. सॉफ्टवेअर या फर्मच्या माध्यमातून कामे केली जातात. हा अपहार होत असताना त्यांच्याही लक्षात आले नाही.

Story img Loader