नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या बी.ए. आणि अभियांत्रिकी (बी.ई.) प्रथम सत्राच्या परीक्षांचे निकाल पाच महिने उलटूनही रखडले आहेत. प्रशासनाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून दुसऱ्या सत्राचे प्रवेशही रखडले आहेत. परीक्षांमध्ये प्रचंड घोळ केल्याचा पूर्वइतिहास पाठीशी असतानाही महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीवर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘विश्वास’ टाकल्याचा परिणाम हिवाळी परीक्षेतील विद्यार्थ्यांना भोगावा लागतो हे उल्लेखनीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सम-विषम पद्धतीने झाल्या असून ‘सम’ सत्रांमधील अनुत्तीर्ण, माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालय स्तरावर घेण्यात आली. तर ‘विषय’ सत्रांतच्या नियमित, अनुत्तीर्ण, माजी आणि बहि:शाल अशा सर्वच परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाईन घेण्यात आल्या. या परीक्षांमध्येही प्रथम वर्ष वगळता इतर सर्व परीक्षा ‘प्रोमार्क’ कंपनीने ऑनलाईन स्वरूपात घेतल्या. यातील केवळ एक परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षांचे सर्व निकालही वेळेत जाहीर करण्यात आले. मात्र, विद्यापीठाचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात नियम असतानाही ‘एमकेसीएल’च्या अखत्यारित असणाऱ्या प्रथम वर्षाच्या बी.ए. आणि अभियांत्रिकी प्रथम सत्राच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल पाच महिन्यांपासून रखडले आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

‘एमकेसीएल’च्या अशाच कामचुकारपणामुळे नागपूर विद्यापीठाने चार वर्षांआधी त्यांच्यासोबतच करार रद्द केला होता. त्यामुळे पुन्हा ‘एमकेसीएल’ला विद्यापीठात काम देण्यावरून सर्वांचाच विरोध होता. मात्र, त्यानंतरही कुलगुरूंनी ‘एमकेसीएल’ला परीक्षेच काम देताच पहिल्याच परीक्षे ‘एमकेसीएल’चा बोजवारा उडाला आहे. मधल्या काळात विद्यापीठाचे हिवाळी प्रथम सत्राच्या काही परीक्षांचे निकाल जाहीर झाले. मात्र, महत्त्वाच्या व मोठ्या असणाऱ्या बी.ए. आणि बी.ई. अभ्यासक्रमाचे निकाल पाच महिन्यांपासून निकाल रखडल्याने प्रशासनावर टीका होत आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university exam results not declared for five months tmb 01
Show comments