नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ जानेवारी रोजी नागपूर चित्रपट महोत्सव आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या चित्रपट महोत्सवाचे नागपुरात प्रथमच आयोजन होत असून विद्यापीठात महोत्सवाच्या चलचित्राचे अनावरण प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कपिल शर्मा शोचे लेखक एकाग्र शर्मा, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य डॉ. किशोर इंगळे, विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस असलेल्या १२ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ परिसरात होत आहे. या चित्रपट महोत्सवामध्ये लघु चित्रपट, माहिती पट, लहान मुलांकरिता, व्यावसायिक, कॅम्पस, रील, वर्टीकल, ॲनिमेशन आदी विविध श्रेणींमध्ये चित्रपट तयार करता येणार आहेत.
हेही वाचा : “पोलिसांनी गुन्हा केला तर अधिक कठोर…”, वाचा, जामीन रद्द करताना काय म्हणाले न्यायालय?
याकरिता महिला सशक्तिकरण, रोजगार सृजन, सामाजिक समरसता, पर्यावरण, भविष्यातील भारत, जनजातीय समाज, ग्रामीण विकास, लोक संस्कृती, जलवायू परिवर्तन, शौर्याच्या कथा, नैतिक कथा, नागरिकांची जबाबदारी, भारतीय कुटुंब प्रणाली, वोकल फाॅर लोकल, विकसित भारत, भारतीय ज्ञान परंपरा, विज्ञान आणि तंत्रज्ञान असे अनेक अन्य विषय या फेस्टिवलसाठी राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २ लाखांपर्यंत नगद पुरस्कार दिले जाणार आहे. स्पर्धेत व्यावसायिक गटात ५०० रुपये, विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये शुल्क राहणार आहे. चित्रपट पाठविण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर आहे.
हेही वाचा : Yavatmal Crime Updates: पतंगाचा दोर, आयुष्याला घोर…. विजेच्या धक्क्याने एका बालकाचा….
अभिनेता राजकुमार १०० वी जयंती विशेष
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी अशा प्रकारचे फेस्टिवल नागपुरात प्रथमच होत असल्याने आयोजकांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. मनात आलेल्या कल्पनांना मूर्त रूप आणण्याचे काम आपण करीत असून मस्तीष्कात आलेले विचार उभे करण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे ते म्हणाले. नागपूरच्या इतिहासात या क्षणाची ऐतिहासिक नोंद होईल असे ते म्हणाले. कपिल शर्मा शोचे लेखक एकाग्र शर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले. विशेष म्हणजे, प्रसिद्ध सिने अभिनेता राजकुमार यांची १०० वी जयंती असल्याने चलचित्र अनावरण कार्यक्रम अवस्मरणीय ठरणार असल्याचे आयोजक जय गाला यांनी सांगितले.