देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांवर उजव्या विचारधारेच्या संघटनांचे वर्चस्व प्रस्थापित होताच अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकातील काँग्रेसच्या इतिहासाला कात्री लागली आहे. एम.ए. अभ्यासक्रमात भाजपच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. कम्युनिस्ट पक्षाला तर इतिहासातून वगळण्यातच आले आहे. ‘१९८० ते २००० दरम्यानचे आंदोलन’ म्हणून रामजन्मभूमीचे आंदोलन शिकवले जाणार आहे.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
land acquisition for shaktipeeth expressway
आठवड्याभरात शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात; कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ८२०० हेक्टर जमिनीचे संपादन
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले

हेही वाचा >>> नागपूर: मंत्र्यांच्या पत्रात माजी आमदारांचा आमदार असा उल्लेख, विद्यमान संतापले

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या नावावर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने इतिहासाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. भाजपचा समावेश करण्यासाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती १९४८ ते २०१० अशी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील ‘राष्ट्रीय राजकीय पक्ष’ या प्रकरणात काँग्रेसचा इतिहास कमी करण्यात आला आहे. त्याऐवजी आता जनसंघाची स्थापना, भाजपची स्थापना, त्यांचे कार्य, विस्तार, विचारधारा, त्यांची राष्ट्रीय भूमिका आदींची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> नागपूर : विमान प्रवासात दोन वर्षांच्या मुलीचा श्वास गुदमरला अन्…; थरारक घटना समोर

विद्यापीठाने यापूर्वी २०१९ मध्ये बी.ए.च्या अभ्यासक्रमात बदल करताना त्यामध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र निर्माणात योगदान’ या प्रकरणाचा समावेश करण्यासाठी ‘नेचर ऑफ मोडरेट पॉलिटिक्स’ आणि ‘राईज अँड ग्रोथ ऑफ कम्युनॅलिझम’ या दोन विषयांचा इतिहास वगळण्यात आला होता. त्यावेळी विविध संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर आता भारतीय स्वातंत्र्य लढय़ात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या काँग्रेस पक्षाच्या इतिहासाला कात्री लावत भाजपचे इतिहासातील ‘महत्त्व’ वाढवण्यात आल्याने नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रादेशिक पक्षांचा इतिहास वगळला

प्रत्येक राज्यातील काही प्रमुख प्रादेशिक पक्षांचे महत्त्व नाकारता येत नाही. त्यांचा इतिहासही नवीन पिढीला माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, नव्या अभ्यासक्रमातून प्रादेशिक पक्षांचा इतिहासच वगळण्यात आला. कम्युनिस्ट पक्ष हा सध्या राष्ट्रीय पक्ष राहिला नसल्याचा युक्तिवाद करत राष्ट्रीय पक्षांच्या प्रकरणातून त्याला वगळण्यात आले आहे. उजव्यांचा इतिहास शिकवण्यासाठी डाव्यांचा इतिहास डावलण्यात आल्याची चर्चा आहे.

रामजन्मभूमी हे जनआंदोलन

इतिहासाच्या अभ्यासक्रमात १९८० ते २००० या दरम्यानच्या आंदोलनांत जनआंदोलन म्हणून आता रामजन्मभूमीचे आंदोलन शिकवले जाणार आहे. तर खलिस्तानी चळवळीचा इतिहास वगळण्यात आला आहे.

नवा अभ्यासक्रम १९४८ ते २०१० पर्यंत आहे. त्यामुळे त्यात जनसंघ आणि त्यानंतर भाजपचा इतिहास देण्यात आला. मात्र, काँग्रेसला वगळण्यात आलेले नाही. कम्युनिस्ट पक्ष सध्या राष्ट्रीय पक्ष नसल्याने त्याला राष्ट्रीय पक्षाच्या प्रकरणातून वगळले. पं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींची भूमिका या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

डॉ. श्याम कोरेठी, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष.

भाजप शासकीय संस्थांचा वापर स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी वारंवार करीत आहे. स्वातंत्र्य लढय़ात सहभाग नसलेल्या पक्षांचा इतिहासाच्या अभ्यासक्रमात समावेश करणे चुकीचे आहे. अभ्यासक्रमात बदल करून काँग्रेसचा इतिहास आणि योगदान पुसता येणार नाही.– विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

Story img Loader