सहकारी प्राध्यापकांविरोधात लैंगिक छळाची तक्रार असल्याचे सांगून त्यांची आर्थिक लूट करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांना प्राथमिक चौकशी समितीने दोषी ठरवले आहे. आता त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आल्याने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून ही चौकशी होणार आहे. मात्र, अद्यापही चौकशी समिती गठित न झाल्याने डॉ. धवनकर यांची चौकशी कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा- नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चौधरींकडून राज्यपालांच्या आदेशाची अवहेलना!

1 thousand 201 complaints received on C Vigil App within a month for violation of code of conduct
आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरात १ हजार २०१ तक्रारी प्राप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल

धवनकर प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश अजय चिंतामण चाफले यांच्या समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सोपवला आहे. चाफले यांनी सातही तक्रारकर्त्यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. तक्रारकर्तेही शेवटपर्यंत आपल्या तक्रारीवर ठाम होते. त्यांनी धवनकर यांनी कशी फसवणूक केली याची संपूर्ण माहिती दिली. त्यावर समितीने आपल्या अहवालात धवनकर यांना दोषी ठरवले. तसेच धवनकर यांची विभागीय चौकशी करावी अशी शिफारसही केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांची समिती तयार केली जाणार असून ही समिती चौकशी करणार आहे. मात्र, अद्याप समितीचे गठण झालेले नाही.

हेही वाचा- ठरलं! नागपूर पोलीस मिळवून देणार तृतीयपंथीयांना विविध कामे

सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असलेल्या डॉ. धवनकर यांच्या पराक्रमाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडले आहे. यासदंर्भात आता शैक्षणिक वर्तुळात उलट-सुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. हे सात प्राध्यापक धवनकर यांच्या जाळ्यात कसे सापडले, त्यांच्यावर कुठला दबाव होता, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, समितीने आता धवनकरांना दोषी ठरवल्याने कठोर कारवाईची शक्यता आहे.