नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात सोमवारी दोन गटात दंगल उसळली. या हिंसाचारात इरफान अन्सारी (३८, रा. गरीब नवाज नगर) हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्या युवकावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसापासून त्याची प्रकृती चिंताजनक होती.
अशातच शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जखमी इरफान अन्सारी याचा मृत्यू झाला. यानंतर मेयो रुग्णालयासमोर मोठी गर्दी जमा झाली असून तेथे तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मेयो रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच सशस्त्र जवान सुद्धा या भागात तैनात केले आहे. यासोबतच मोमीनपुरा हंसापुरी चिटणीस पार्क चौक आणि भालदार पुरा यासह तहसील लकडगंज गणेश पेठ या भागात सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे . इरफान अन्सारी च्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.