नागपूर : नागपूर ते वर्धा तिसरा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी रेल्वेने खापरी येथील जुना रेल्वे उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारी पोकलँड आणि ट्रकच्या मदतीने जुन्या पुलाचा काही भाग पाडण्यात आला. या पुलावरून होणारी वाहतूक शेजारच्या नवीन पुलावरून वळवण्यात आली आहे.
नागपूर-वर्धा दरम्यान तिसरा रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण केले आहे. नागपूर ते खापरी आणि वर्धा ते खापरी दरम्यान रुळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग ७ वरील जुन्या पुलामुळे हे दोघे जोडले जाऊ शकले नाहीत. जुन्या पुलाखालून सध्या फक्त दोनच मार्गिका आहेत. तिसऱ्या मार्गासाठी हा पूल काढणे आवश्यक होते. हे पाहता रेल्वे विभागाने तिसऱ्या मार्गासाठी पूल तोडण्याचे काम सुरू केले आहे.
हेही वाचा – मादक द्रव्याचे भय दाखवून प्राध्यापक महिलेची लाखोने फसवणूक, गुजरातमधून दोघांना अटक
हेही वाचा – जादूटोण्याच्या संशयावरून पुतण्यानेच पेटवले काकाचे घर
सोमवारी पोकलॅंड व ट्रकच्या साह्याने जुन्या पुलाची माती काढण्याचे काम सुरू झाले. पुलाच्या खापरी भागातील माती काढण्याचे काम सुरू आहे. रस्ता तोडण्यापूर्वी जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून नवीन पुलावरून वाहने जात आहेत. वाहनांच्या वाहतुकीत अडचण येऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावून दुभाजकांची विभागणी करण्यात आली आहे.