नागपूर : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. कळमना बाजार परिसरातील वस्त्यांसह नरेंद्रनगर परिसरातील अनेक वस्त्यांना पावसाचा फटका बसला. रविवारी रात्री शहरात मुसळधार पाऊस पडला. नरेंद्रनगरमधील विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, उमंग सोसायटी, वेणूवन सोसायटी, डोबीनगर परिसरात रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणी साचले आहे. विजया किराणा, कालिंदी अपार्टमेंटसह अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसाळ्यात येथे नेहमी पाणी साचत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नरेंद्रनगरात अलीकडेच सिमेंट रस्ते करण्यात आले. रस्ते उंच करण्यात आल्याने घरे खाली गेली, त्यामुळे थोडाही पाऊस आला तर सरळ रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरते. रस्त्यांवरच्या पाण्याचा  निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने थोडा पाऊस झाला तरी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप येते.

Story img Loader