मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.पण खाते वाटप अडले. त्यामुळे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खुलासा केला. खाते वाटप लवकरच होईल, काळजी करू नका,आम्ही पेपर फोडला तर तुम्हाला काम शिल्लक राहणार नाही, असे ते म्हणाले.
फ़डणवीस गुरुवारी रात्री नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. मुंबईतील मेट्रो कारशेडबाबत ते म्हणाले, केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडसाठी कांजुर मार्गाचा
आग्रह धरला. आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही.
कार शेडचे काम चार वर्ष थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील आहे आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे फडणवीस म्हणाले.