नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांसाठी स्वतंत्र बंगले, सचिवांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. मात्र, मोठ्या संख्येने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका खोलीत चार ते पाच जणांना राहावे लागते. विधिमंडळ सचिवालयाने नागपूर अधिवेशनासााठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्थेबाबत एक परिपत्रक काढले आहे. त्यातून वरील बाब स्पष्ट झाली आहे.

राज्यात नवे सरकार स्थापन झाले नसल्याने अद्याप हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झालेली नाही. साधारणपणे १६ डिसेंबरपासून सुरुवात होईल, असा अंदाज प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केला जात असून त्यानुसारच तयारी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मुंबईतून अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या सचिवालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासव्यवस्थेची जबाबदारी असते. यासाठी नागपुरात कायमस्वरूपी १६० खोल्यांचे गाळे बांधण्यात आले आहे. यावेळी यासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, ती पुरेशी नसल्याने एका खोलीत चार ते पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुक्कामाचे नियोजन सचिवालयाने केले आहे. सचिवालयाच्या परिपत्रकानुसार एका खोलीत गट अ मधील चार अधिकारी व गट ब, क आणि ड श्रेणीतील पाच कर्मचाऱ्यांसाठी एक खोली, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे मंत्री, राज्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र बंगले, स्वतंत्र गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांना मात्र एका खोलीत दोनहून अधिक कर्मचारी,अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Bharat Gogawale on Eknath Shnde
“…अन् शिंदे म्हणाले, मी सत्तेबाहेर राहून काम करेन”, गोगावलेंनी सांगितल्या शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
actress Shobitha Shivanna suicide
अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य
devendra fadnavis loksatta
मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळ्याआधी नागपूरमध्ये चेहरा नसलेल्या नेत्याचे बॅनर्स, काय आहे संकेत?
devendra fadnavis name confirmed for maharashtra chief Minister
फडणवीसच; पण गृह कोणाकडे? एकनाथ शिंदे मुंबईत परतल्याने खातेवाटपाची चर्चा आजपासून
Prataprao Jadhav On Sanjay Gaikwad
Prataprao Jadhav : संजय गायकवाडांच्या आरोपाला मंत्री प्रतापराव जाधव यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आमचा उमेदवार…”
Prayagraj Maha kumbh Mela 2025 New District in Marathi
Maha kumbh Mela 2025 New District: महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा; योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय!

हेही वाचा : नागपूरकरांचे फोन लागेना, ऑनलाईन पेमेंट देखील होईना…

गटनिहाय नावे मागवली

एका खोलीत एकाहून अधिक कर्मचारी, अधिकारी राहणार असल्याने त्यांच्यात समन्वय असावा यासाठी विधिमंडळ सचिवालयाने कर्मचाऱ्यांकडून चार किंवा पाच कर्मचाऱ्यांचा गट तयार करून त्यानुसार नावे कळवण्याचे आवाहन केले आहे. त्या गटानुसारच खोल्यांचे वाटप केले जाणार आहे. इतरांना त्या खोलीत प्रवेश नसेल. एखाद्या गटाकडून कमी नावे प्राप्त झाल्यास रिक्त जागी नावे सचिवालयाच्या माध्यमातून त्यात समाविष्ट केली जाणार आहेत. पाच डिसेंबरपर्यंत ही नावे कळवायची आहेत. अनेक कर्मचाऱी त्यांची नावे खोल्यांमध्ये निवासासाठी देतात, मात्र त्यांचा मुक्काम हा नागपुरातील नातेवाईकांकडे असतो. अशा कर्मचाऱ्यांनी नावे कळवू नये, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांची नागपूर अधिवेशनासाठी नियुक्ती झालेली नसतानाही त्यांची नावे निवासव्यवस्थेसाठी देतात. त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवली जाणार नाही, शिवाय ही बाब उघडकीस आल्यास शिस्तभंग कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.