नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशानासाठी तारांकित प्रश्नांचा पाऊसही पडत असून विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न दाखल झाल्याची माहिती आहे, तर गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.
या अधिवेशनात तीन आठवड्यांचे कामकाज प्रस्तावित केले आहे. यात सुट्यांसह अधिवेशनाचे एकूण १४ दिवस असेल. यात एकूण प्रत्यक्ष कामकाजाचे १० दिवस आहे. गुरुवार, ७ डिसेंबरला पहिल्या दिवशी अध्यादेश सभागृहाच्या पटलावर टेवण्यात येतील. यासोबतच २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज व शोक प्रस्ताव असेल. शुक्रवार, ८ डिसेंबरलाही शासकीय व अशासकीय ठराव असतील. त्यानंतर दोन दिवस सुटी असेल.
हेही वाचा – दिवाळीत ‘समृद्धी महामार्ग’वरून विक्रमी वाहनांचा प्रवास
हेही वाचा – यवतमाळ : देशी बनावटीचे पिस्टल सहज होतात उपलब्ध! ११ महिन्यांत १६ कारवाया
दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या सोमवार, ११ डिसेंबरला शासकीय व अशासकीय कामकाज असले. मंगळवार, १२ डिसेंबरला पुरवणी विनियोजन विधेयकासह सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल. गुरुवारला विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल. शुक्रवारला शासकीय व अशासकीय विधेयके असतील. तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस कामकाज असेल. मंगळवारला अंतिम आठवडा प्रस्ताव असेल. अधिवेशनाचा समारोप शासकीय कामकाजाने होईल, अशी तात्पुरती दिनदर्शिका विधीमंडळाने जारी केली आहे.