नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. त्यासाठी येणाऱ्या मंत्र्यांना नागपूरच्या रवीभवनात बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते व शालेय शिक्षण मंत्री चंदकांत पाटील यांच्या शेजारी हसन मुश्रीफ यांचा बंगला असणार आहे तर वैदर्भीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बाजुला राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुक्काम असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर अधिवेशन काळात कॅबिनेट मंत्र्यांच्या मुक्काम हा रविभवन परिसरातील बंगल्यांमध्ये असतो. या बंगल्यांचे वाटप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले जाते. येत्या अधिवेशनासाठी बंगल्यांचे वाटप झाले आहे. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे बंगले ठरलेले असतात. यावेळी दोन उपमुख्यमंत्री असल्याने प्रशासनाला अजितदादांसाठी वेगळ्या बंगल्यांची व्यवस्था करावी लागली. हा बंगला रविभवन परिसराबाहेरचा आहे.

हेही वाचा : दीडशेवर कैद्यांना तीन महिन्यांची शिक्षा माफ; काय आहे कारण? जाणून घ्या…

उर्वरित मंत्र्यांसाठी रविभवनातील बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रकांतदादा आणि मुश्रीफ हे शेजारी आहेत. मुश्रीफ यांना सात क्रमांकाचे तर चंदकांतदा यांना आठ क्रमांकाचे निवासस्थान ( कुटीर) मिळाले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना क्रमांक तीनचे तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चार क्रमांकाचे निवासस्थान मिळाले आहेत.

हेही वाचा : “ओबीसींना लोकसंख्येनुसार ५२ टक्के आरक्षण द्या”, प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची मागणी

विदर्भातील शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (बंगला क्र. १४) आणि राष्ट्रवादीचे ( अजित पवार) धनंजय मुंडे ( बंगला क्र १५) शेजारी आहेत. दीपक केसरकर यांच्या बाजूला अब्दुल सत्तार, धर्मरावबाबा आत्राम यांचा बंगला आहे. शंभूराजे देसाई यांच्या शेजारी आदिती तटकरे आणि लोकांच्या शेजारी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा बंगला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur winter session chandrakant patil bunglow next to hasan mushrif bunglow cwb 76 css