नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने आज राजकीय वातावरण तापले असतानाच उपराजधानीत पारा सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात आता उपराजधानीतील गारठा वरचढ ठरतो, की तापलेले राजकीय वातावरण हे सायंकाळनंतरच ठरणार एवढे मात्र नक्की!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फेंगल वादळाचा प्रभाव ओसरल्याने विदर्भात थंडीचा जोर वाढू लागला आहे. रविवारी विदर्भातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नागपूर शहरात सात अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. गेले काही दिवस विदर्भात पारा सातत्याने दहा अंश सेल्सिअस खाली गेला आहे. कडाक्याची थंडी, बोचरे वारे वाहत असल्याने नागपूरसह अवघा विदर्भ गारठला आहे. गोंदिया, साकोली, भंडारा जिल्ह्यात देखील कडाक्याची थंडी आहे. गेल्या काही दिवसापासून नागपूर विदर्भात कडाक्याची थंडी पडत आहे. गोंदिया, नागपूर हे जिल्हे सातत्याने १० अंशाच्या खाली तापमानाची नोंद करत आहेत. शनिवारी या शहरात सर्वाधिक कमी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर गोंदिया येथे ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

हेही वाचा – जिल्हा नियोजन अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, गडचिरोलीत चाललेय तरी काय?

आज रविवारी देखील नागपूर सात अंश सेल्सिअस तर वर्धा ७.४ अंश सेल्सिअस, भंडारा आठ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरमध्ये थंडीचा प्रभाव आता स्पष्टपणे दिसून येत आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर नागपुरात पहिलेच हिवाळी अधिवेशन होत आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी देखील आज याच विदर्भाच्या उपराजधानीत होत आहे. त्यामुळे शहरात आता आठ दिवस चोख बंदोबस्त असणार आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात इतर ठिकाणी हवामानात बदल होणार असले तरी विदर्भात गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांसमोर कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणे हे एक आव्हान असणार आहे. त्यांना शेकोट्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण विदर्भातून तरी थंडी सध्याच कमी होण्याचे कोणतेही संकेत नाहीत. ही थंडी रात्रीच नाही तर दिवसादेखील गारठवणारी आहे. प्रत्येकाला स्वेटर घालूनच बाहेर पडावे लागत आहे.

हेही वाचा – संभाव्य मंत्र्यांना अखेर निरोप पोहोचले; चव्हाण, मुनगंटीवार यांना विश्रांती, वर्धेचे पंकज भोयर यांना संधी

रात्रीच्या वेळी रस्त्यावर, लग्न, स्वागत समारंभात ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पहावयास मिळत आहेत. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागररावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे मध्य भारतात ढगाळ वातावरण तयार झाले. थंडी बेपत्ता झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा डिसेंबरची थंडी जोरात आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात थंडीचा असा प्रभाव कायम राहणार आहे.