नागपूर: नागपूरसह देशभरात सातत्याने महागाई वाढत असतानाच दुसरीकडे तरुणांना रोजगाराच्या फारश्या संधी मिळत नाही. राज्यात महायुतीचे नवीन सरकार लवकरच स्थानापन्न होणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान तरुणांना रोजगाराच्या संधी आहे. त्यामध्ये लिपीक, टंकलेख, शिपाईपदाबाबत तरुणांना कोणती संधी आहे? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या कार्यालयीन कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात लिपिक- टंकलेखकाची १० पदे आणि शिपाई/ संदेश वाहक यांची २४ पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी कार्यालयीन वेळेत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह संबंधित कार्यालयात अर्ज करावे लागणार आहे. त्यामुळे तरुणांनी अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
लिपिक- टंकलेखक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता कमीत कमी १२ वी उत्तीर्ण, टाईपिंग इंग्रजी ४० तर मराठी ३० शब्द प्रति मिनीट एवढी गती आवश्यक आहे. शिपाई पदासाठी उमेदवार कमीत कमी ४ थी व त्यापेक्षा अधिक वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर लिपिक टंकलेखक आणि शिपाई पदाकरिता खुला संवर्गासाठी ३८ वर्ष आणि मागास वर्गासाठी ४३ वर्ष (५ वर्षे नियमाप्रमाने शिथिल) इतकी वयोमर्यादा आहे. इच्छुक पात्र उमेदवारांचे अर्ज दिनांक ३ डिसेंबर २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्रमांक २, दुसरा माळा, सिविल लाइन्स, नागपूर ४४०००१ येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. निश्चित तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्विकारले जाणार नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास विभाग, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, प्रशासकीय भवन क्र. २, दुसरा मजला, सिव्हील लाईन्स, नागपूर- ४४०००१ येथे संपर्क साधण्याचे आवाहनही प्रसासनातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा – लोकजागर: दोन पक्षातला फरक!
लवकरच नवीन सरकारचा शपथविधी
महायुतीने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २३५ जागा मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपा १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने २०१४ पेक्षाही (१२२) सर्वात मोठा विजय यावेळी मिळविला. तर शिवसेना (शिंदे) यांनी ५७ आणि अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या आहे. दरम्यान आता राज्यात लवकरच सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असून लवकरच नवीन सरकार स्थानापन्न होण्याची आशा आहे.