नागपूर शहरातील विविध भागात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिटीझन्स फोरमच्या कार्यकत्यानी ‘यमराज’ची वेशभूषा करून आंदोलन केले. ‘खड्डे दाखवा-झोपेतून जागवा’ या अभियानास फोरमच्यावतीने सुरुवात करण्यात आली असून खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रपूर : ८५ वर्षीय जलयोग साधक कृष्णराव नागपुरेंच्या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद
नागपूर सिटिझन्स फोरमने ‘खड्डे दाखवा-झोपेतून जागवा’ हे अभियान हाती घेतले असून त्याची सुरुवात रविवारी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग व मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रस्त्यावर प्रतिकात्मक आंदोलनाद्वारे केली. यावेळी समन्वयक रजत पडोळे यांनी यमराजाची वेशभूषा साकारत रस्त्यावर आंदोलन केले.
…म्हणूनच साक्षात यमराज रस्त्यावर उतरले आहेत –
नागपूर-अमरावती महामार्गावर नागपूर विद्यापीठ कॅम्पस परिसर ते वाडी नाक्यापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली असून जागोजागी बारीक गिट्टी पसरली आहे. या महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात होत असून ये-जा करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही समस्या अधोरेखित करण्यासाठी यमराजाची भूमिका साकारून वाहनचालकांची अडवणूक करत जनजागृती करण्यात आली. नागपूरचे खड्डेमय रस्ते म्हणजे मृत्यूचे द्वार आहे, म्हणूनच साक्षात यमराज रस्त्यावर उतरले आहेत आणि जे लोक या रस्त्यांवरून प्रवास करीत आहेत त्यांना मृत्यूलोकात घेऊन जायला ते आले आहेत, हे अधोरेखित करणारे पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले.
यावेळी फोरमचे सदस्य अभिजीत सिंह चंदेल, अमित बांदूरकर, अभिजीत झा, अमेय पन्नासे, रिया पिंपळकर, अमोल अगस्ती, अंगिरा पांडे, सोमनाथ जाधव, गौरव देशपांडे, शिवम उमरेडकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नागपूर : राजकीय टीका केल्यास कलावंत, वाहिनी सगळेच अडचणीत – समीर चौघुलेंची वास्तवदर्शी प्रतिक्रिया
गरिकांनी खराब रस्ते व त्यावरील खड्ड्यांचे फोटो काढून फोरमला पाठवावे, असे आवाहन या अभियानाचे संयोजक अभिजीत सिंह चंदेल यांनी केले आहे. यासाठी ९७३००१५१७७ व ७४४७८७१५३९ या क्रमांकावर संपर्क साधून खड्ड्यांचे फोटो पाठवावे, असे कळवण्यात आले आहे.