नागपूर : शाळकरी मुले-मुलींसह तरुण-तरुणी शहरातील गजबजलेल्या भागात बिनधास्त सुरु असलेल्या हुक्का पार्लरच्या वाटेवर आहेत. मध्यवर्ती भागात सुरु असलेल्या हुक्का पार्लरमध्ये मध्यरात्रीपर्यंत तरुण-तरुणी हुक्का पार्लरमध्ये धूर उडवित आनंद घेत आहेत. या सर्व प्रकाराला ठाणेदारांचा अर्थपूर्ण आशीर्वाद आहे.पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सींगल यांनी ड्रग्स फ्री नागपूर अभियान सुरु करुन शहरातील अंमली पदार्थ विक्री आणि हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक ठाणेदारांना दिले होते. मात्र, ठाणेदारांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुक्का पार्लर संचालकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवले. त्यामुळे अंबाझरी, सीताबर्डी, सदर, बजाजनगर, प्रतापनगर, वाडी, गिट्टीखदान, गणेशपेठ, नंदनवन, सक्करदरा, धंतोली आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक हुक्का पार्लर सुरु आहेत. तत्कालिन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात शहरातील हुक्का पार्लर पूर्णपणे बंद झाली होती. मात्र, आता ठाणेदारांवर पोलीस आयुक्तांचा वचक नसल्यामुळे पुन्हा हुक्का पार्लर सुरु झाल्याची चर्चा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा