लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत विविध भागातील कृत्रिम तलावात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मानाचा गणपती असलेल्या नागपूरच्या राजा गणरायाची ढोल ताशांच्या निनादात दुपारी मिरवणूक निघाली.
गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवात नागपूर आणि जिल्ह्य़ातील वातावरण गणेशमय झाले होते. आज सकाळपासून शहरातील विविध भागातील गणेश मंडळांमध्ये गणेश विसर्जनाची तयारी करण्यात कार्यकर्ते व्यस्त असताना दुपारनंतर गणपती विसर्जनाला प्रारंभ झाला. तुळशीबागेतून नागपूरच्या राजा असलेल्या गणणरायाची ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक निघाली. शुक्रवार तलाव, फुटाळा तलाव, नाईक तलाव, सक्करदरा तलाव, सोनेगाव तलावातमूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली त्यामुळे या परिसरात कृत्रिम टाक्याची टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपुरात २११ विसर्जनस्थळी ४१३ कृत्रिम टाक्याची व्यवस्था करण्यात आली असून सकाळपासून कृत्रिम टाक्यात गणरायाचे विसर्जन केले जात आहे.
आणखी वाचा-अकोल्यातील अंध युवकांच्या क्रिकेट संघाची कमाल; राज्यस्तरीय चषकावर कोरले नाव
तलाव परिसरात पर्यावरणवादी संघटानाकडून कृत्रिम टाक्यात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी सहकार्य केले जात आहे. ४ फुटापेक्षा उंच असलेल्या गणरायाची मूर्ती विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठे कृत्रिम टाके तयार करण्यात आले आहे.दुपारनंतर तलाव परिसर श्री गणरायाच्या आरतीने मंगलमय होऊन गेला. आज ईद आणि गणेश विसर्जन असल्यामुळे शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.