लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. परंतु या निवडणुकीत प्रथमच नागपूर जिल्ह्यातून एकही उमेदवार निवडून आला नाही.
एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरणासाठी केलेल्या आंदोलनापासून कर्मचाऱ्यांवर सदावर्तेंची जादू कायम आहे. सोमवारी बँकेच्या निकालात सदावर्ते यांच्या पॅनलने संदीप शिंदे यांच्या एसटी कामगार संघटनेच्या पॅनलचा दारुण पराभव केला. आजपर्यंत सातत्याने नागपूर जिल्ह्यातील एकतरी उमेदवार विजयी होत होता. परंतु यंदा एकही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.
आणखी वाचा-नागपूर ‘एम्स’मध्ये रुग्णांना लुटण्याची नवीन क्लुप्ती, प्रकरण काय?
नागपूर जिल्ह्यातून यंदा वेगवेगळ्या पॅनलमधून पाच उमेदवार मैदानात होते. त्यात कामगार संघटनेचे प्रवीण पुनेवार, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पॅनलमधून उमा घाटगे, अपक्ष म्हणून प्रवीण डफळे, सेना- इंटक- कास्ट्राईबमधून विलास मते, इंटक (कामगार काँग्रेस) मधून सुषमा सोनटक्के यांचा समावेश होता. प्रवीण पुनेवार यांना ११ हजार २५, उमा घाडगे यांना १० हजार ७४०, प्रवीण डफळे यांना १ हजार ७२६, विलास मते यांना ४ हजार ७१३, सुषमा सोनटक्के यांना २ हजार २४१ मते मिळाली. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी भंडारा जिल्ह्यातून एक उमेदवार निवडून आल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.
कोणत्याच गटाला यश नाही
एससी-एसटी गटातून नागपूर जिल्ह्यातील प्रवीण घुगे हे अपक्ष म्हणून तर एनटी एसबीसी गटातून इंटककडून सुनील साठोड मैदानात होते. परंतु दोघांचाही पराभव झाला. घुगे यांना ४९६ तर साठोड यांना २ हजार ७२६ मते मिळाली.