महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : नागपूरचे रहिवासी डॉ. रुपेश बोकाडे पर्यटनासाठी हिमाचलमधील चंद्रताल या गिरिस्थळी गेले होते. समुद्र सपाटीपासून १५ हजार फुट उंचीवर हिमवर्षा सुरू झाली. परिणामी, ३०० पर्यटक अडकून पडले. अशा स्थितीत डॉ. रुपेश बोकाडे यांनी तब्बल सात दिवस स्वत:ची पर्वा न करता येथे अनेक पर्यटकांना वैद्यकीय सेवा पुरवली.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
Butibori bridge case, Butibori bridge case,
नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे
Nagpurs Weston Coalfields Limited provides assistance in Assam mining disaster
आसमच्या खाण दुर्घटनेत नागपूरच्या ‘वेकोलि’कडून मदत
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
infiltrating boat seized by fisheries department with the help of local fisherman
रत्नागिरीत घुसखोरी करणाऱ्या मलपी येथील मासेमारी बोटीचा थरारक पाठलाग, गस्ती नौकेला एक बोट पकडण्यात यश

डॉ. बोकाडे हे नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांनी चंद्रताल येथील चित्तथरारक अनुभव ‘लोकसत्ता’ला सांगितला. ते म्हणाले, मी ८ जुलैला पर्यटनासाठी चंद्रतालला पोहचलो. आमच्या चमूत ३० जण होते. आम्ही टेकडीवर चालणे सुरू केले. वेगवेगळ्या चमूमध्ये विदर्भातील सुमारे ३० जणांसह देश- विदेशातील ३०० पर्यटक होते. त्यात स्थानिक पोलीस अधीक्षक, गुजरातमधील निवृत्त न्यायाधीश, राज्यपालांचे अधिकारी अशा महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश होता.

आणखी वाचा-विदर्भात सात पाऊसबळी; अमरावतीत तीन, यवतमाळमध्ये दोन, अकोला, बुलढाण्यातील प्रत्येकी एकाचा समावेश  

१५ हजार फुट उंचीवर हिमवर्षा सुरू झाली. आम्हाला तेथेच थांबवून राहण्यासाठी तंबू लावून दिले. परंतु, वातावरण आणखी बिघडले. बर्फाचा चार ते पाच फुट थर साचला. आणखी किती दिवस रहावे लागेल, हे स्पष्ट नव्हते. भ्रमनध्वनी बंद पडला. जनरेटरचे इंधन संपले. खाण्याचे साहित्य मर्यादित असल्याने ते टिकवण्यासाठी अर्धपोटी राहावे लागले. दोन- तीन दिवसांनी हिमवर्षा कमी झाल्यावर एक अधिकारी आम्हाला शोधत आला व सर्व पर्यटकांची नावे व आधार कार्ड घेऊन परतला. दरम्यान, एका महिलेची प्राणवायूची पातळी ४० वर आली. मी एकटाच डॉक्टर होतो. रुग्णाला जीवनरक्षण प्रणालीची गरज असल्याचे पोलीस अधीक्षकांना सांगितले. वातावरण योग्य होईपर्यंत महिलेला वाचवण्यासाठी आमची धडपड सुरू होती. अखेर सैन्याच्या चॉपरने वैद्यकीय साहित्य आले. महिलेची प्रकृती स्थिर झाल्यावर तिला सैन्याच्या विमानाने एम्सला हलवले. या सात दिवसांत येथे बऱ्याच जणांची प्रकृती बिघडली. माझ्यासह चमूचे नेतृत्व करणाऱ्यांकडे असलेल्या मर्यादित औषधांमध्ये कसेतरी दिवस काढले. शेवटी सहा दिवसांनी हिमवर्षा कमी झाल्यावर प्रशासनाने क्रेन व बुलडोजरच्या मदतीने रस्त्यावरील बर्फ हटवून आम्हाला लोहसर मार्गे परत जाण्यासाठी ट्रक उपलब्ध केल्याचे, डॉ. बोकाडे यांनी सांगितले.

जुलैमध्ये पहिल्यांदाच हिमवर्षा

चंद्रताल येथे जुलै महिन्यात कधीच हिमवर्षा होत नसल्याचे येथे आमच्यासाठी अन्न तयार करणाऱ्या स्थानिकांनी सांगितले. ही हिमवर्षा बघून तेही घबरले होते. येथे सर्व पर्यटक एकमेकांना आधार देत होते, असेही डॉ. बोकाडे यांनी सांगितले.

Story img Loader