वर्धा : गावातून कर गोळा करण्याची बाब कटकटीची समजल्या जाते. कारण शेतमजूर, कष्टकरी त्यासाठी समर्थ असतातच असे नाही. पण शहरालगत म्हणून श्रीमंत समजल्या जाणाऱ्या नालवाडी ग्रामपंचायतलापण कर गोळा करण्यासाठी युक्ती करावी लागली. कर भरल्याची पावती असल्यास नागरिकांना दोन कचरा कुंड्या मोफत देण्याचे ठरले. त्यास चांगलाच प्रतिसाद लाभत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – तरुणांनो सावधान! आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ व्हायरल, दगडफेक केली तर ‘या’ कलमांनुसार आयुष्यभर नोकरीची संधी मिळणार नाही

ओला व सुखा कचरा टाकण्यासाठी सरपंच प्रतिभा माऊसकर यांनी दोन दर्जेदार कुंड्यांचे वाटप सुरू केले आहे. पंचायतीचे उत्पन्नपण वाढणार व गावाची स्वच्छतासुद्धा राखल्या जाणार असल्याचे त्या सांगतात. उपसरपंच महेश शिरभाते तसेच सदस्य वैभव सूर्यवंशी, सरिता बनकर, अमोल मानकर, अशोक कावळे, ग्रामविस्तार अधिकारी रमेश तेलरांधे या कामी पुढाकार घेत नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. घनकचरा व्यवस्थापन व उत्पन्न असा दुहेरी हेतू साध्य करणे शक्य झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nalawadi gram panchayat trick to collect tax pmd 64 ssb
Show comments